गोरखपूर : ‘हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी आवश्यक आध्यात्मिक बळ केवळ साधनेनेच प्राप्त होऊ शकते’, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे उत्तरप्रदेश आणि बिहार राज्यांचे समन्वयक श्री. विश्वनाथ कुलकर्णी यांनी धर्मप्रेमींना केले. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी कुशल हिंदु राष्ट्र संघटक निर्माण करणे, तसेच त्यांना साधनेविषयी मार्गदर्शन करणे, यांसाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील डॉ. ओमनारायण यांच्या निवासस्थानी हिंदु राष्ट्र संघटन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत उपस्थित असलेल्या धर्माभिमान्यांना श्री. कुलकर्णी संबोधित करत होते. या वेळी समितीचे श्री. प्रशांत वैतीही उपस्थित होते.
क्षणचित्र
या कार्यशाळेसाठी श्री. राजन श्रीवास्तव यांनी विशेष परिश्रम घेऊन योगदान दिले. कार्यशाळेत उपस्थित सर्व धर्मप्रेमींनी हिंदूंवरील आक्रमणांच्या विरोधात शासनाला निवेदन देण्याचा निर्णय घेतला. या समवेतच प्रत्येक १५ दिवसांनी धर्मशिक्षणवर्गाचेही आयोजन करण्याचे निश्चित करण्यात आले.