परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त मंदिरांत साकडे घालण्यासह मंदिर स्वच्छतेचेही आयोजन !
वर्धा : परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी येथे ३ मे या दिवशी श्री गणपति मंदिरात सकाळी सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि भाविक यांच्या वतीने भावपूर्ण साकडे घालण्यात आले. सर्वांनी नतमस्तक होऊन प्रार्थना केली. त्यानंतर सामूहिक आरती करून हिंदु राष्ट्राचा जयघोष करण्यात आला.
या वेळी विश्व हिंदु परिषदेचे श्री. अतुल शेंडे, पुजारी श्री. रमेश बांगडभट्टी आणि श्री. विनायक वेटाळ, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. भार्गवी क्षीरसागर, सौ. वनिता किरसान, श्री. विजय डगवार, सौ. भक्ती चौधरी, सनातन संस्थेच्या सौ. शिल्पा पाध्ये, सौ. विजया भोळे, तसेच भक्तगण उपस्थित होते.
उंड्री आणि वडगावशेरी (जिल्हा पुणे) येथे देवतांना साकडे
पुणे : हिंदु राष्ट्राचा सर्वप्रथम व्यापक उद्घोष करणारे सनातन संस्थेचे संस्थापक आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रेरणास्थान परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वैशाख कृष्ण पक्ष सप्तमीला (७ मे या दिवशी) असणार्या ७६ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने स्थानिक धर्माभिमान्यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी उंड्री येथील विठ्ठल मंदिर आणि वडगावशेरी येथील बल्लाळेश्वर मंदिर येथे देवतांना साकडे घातले.
‘भारतियांमध्ये सनातन हिंदु धर्माच्या नैतिक मूल्यांचे आचरण करण्याची प्रवृत्ती निर्माण व्हावी. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यासाठी प्रयत्न करणार्या आणि त्याला साहाय्य करणार्या सर्व हिंदु धर्माभिमान्यांचे येणार्या आपत्काळात रक्षण व्हावे. त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक त्रासांचे निवारण होऊन त्यांची आध्यात्मिक उन्नती व्हावी, तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग टळून त्यांचे प्रकृतीस्वास्थ्य उत्तम रहावे’, अशा प्रार्थना या वेळी करण्यात आल्या.
१. उंड्री येथे धर्मप्रेमी श्री. अरविंद शेंडकर आणि सौ. शुभांगी शेंडकर यांनी विठ्ठल-रुक्मिणी यांची भावपूर्ण पूजा करून श्रीफळ वाढवले. ‘जन्मोत्सवाच्या निमित्ताने साकडे घालायला मिळाले, हे आम्ही आमचे भाग्य समजतो. ही सेवा करवून घेऊन देव आमचा उद्धार करत आहे’, असा भाव या वेळी उपस्थित धर्मशिक्षणवर्गातील महिलांनी व्यक्त केला.
२. वडगावशेरी येथील श्री बल्लाळेश्वर मंदिरात साकडे घालतांना ३५-४० जण उपस्थित होते. उपस्थित गणेशभक्तांनी भावपूर्ण प्रार्थना केली. मंदिराचे विश्वस्त आणि पुजारी यांनी हिंदु जनजागृती समितीच्या कार्याचे कौतुक केले. मंदिरात साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ चालू करण्यात आले. साप्ताहिकामध्ये येणारे हिंदु धर्म आणि सण यांची माहिती भक्तांनी आवजूर्र्न वाचावी, असे आवाहन मंदिराच्या विश्वस्तांनी उपस्थित भाविकांना केले.