Menu Close

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रात ठिकठिकाणी उपक्रम

मुंबईत मंदिरांच्या स्वच्छतेत धर्मप्रेमींचा सहभाग !

मुंबई : २८ एप्रिल या दिवशी घाटकोपर (पूर्व) भटवाडी येथील गणपति मंदिराची धर्मप्रेमी आणि साधक, तसेच वाचक यांनी स्वच्छता केली. मंदिर विश्‍वस्तांनी ३ मे या दिवशी आरतीनंतर विषय मांडण्याची अनुमती दिली.

२९ एप्रिल या दिवशी जोगेश्‍वरी येथील पिंपळेश्‍वर महादेव मंदिराची साधकांनी धर्मप्रेमींसह स्वच्छता केली.

३० एप्रिल या दिवशी विरार (पूर्व) येथील दत्त मंदिराची धर्मप्रेमी आणि साधक यांनी स्वच्छता केली. मंदिर विश्‍वस्त श्री. वैद्य यांनी यासाठी सहकार्य केले.

१ मे या दिवशी अंधेरी (पश्‍चिम) येथील हनुमान मंदिराची साधक, तसेच वाचक यांनी स्वच्छता केली, तर नेरूळ (नवी मुंबई) येथील गावदेवी मंदिराची स्वच्छता करण्यात आली.

३ मे या दिवशी सांताक्रूझ येथील श्री साईबाबा मंदिराची धर्मप्रेमी आणि साधक तसेच वाचक यांनी स्वच्छता केली. धर्मप्रेमी ‘आपलेच मंदिर आहे’, हा भाव ठेवून सेवेत सहभागी झाले.

बोईसर येथे धर्मप्रेमींकडून मंदिर स्वच्छता !

१ मे या दिवशी दत्तवाडी येथील धर्मप्रेमी आणि साधक यांनी दत्त मंदिराची स्वच्छता केली. श्री. संजय नारखेडे आणि श्री. कोल्हे यांनी यासाठी सहकार्य केले. या वेळी ११ ते १२ वर्षांच्या २ मुलांनी सहभाग घेतला. यातील एक मुलगा म्हणाला, ‘‘साधकांसह आपण मंदिराची स्वच्छता केल्यास आपल्याला पुण्य लाभेल.’’

पवई येथील दुर्वाप्रिय गणेश मंदिरात ४५ जणांकडून श्री गणेशाला साकडे !

६ मे या दिवशी पवई येथील सुप्रसिद्ध दुर्वाप्रिय गणेश मंदिरात हिंदुत्वनिष्ठ, धर्मप्रेमी, सनातनचे वाचक आणि गणेशभक्त, जिज्ञासू अशा मिळून ४५ जणांनी पुरोहित श्री. सदाशिव कुलकर्णी यांच्यासह श्री गणेशाच्या चरणी साकडे घातले. हिंदु जनजागृती समितीचे श्री. सतीश सोनार यांनी प्रारंभी श्री गणेशाला साकडे घालण्याचा हेतू आणि महत्त्व उपस्थित भाविकांना सांगितले, तसेच हिंदु राष्ट्रजागृती अभियानाची माहिती सांगितली. या वेळी बजरंग दलाचे श्री. संतोष गुप्ता म्हणाले, ‘‘सर्व हिंदूंनी अशा प्रकारे आपल्या प्रत्येक उपक्रमात केवळ सहभागी होऊन हिंदुत्वाचे, धर्माचे कार्य केले, तर संतांनी सांगितलेले हिंदु राष्ट्र निश्‍चितच येणार आहे. हिंदु जनजागृती समितीच्या प्रत्येक उपक्रमात मी माझ्या कार्यकर्त्यांसमवेत नियमित सहभागी होईन.’’

या वेळी विश्‍व हिंदू परिषदेचे श्री. रामकृष्ण राव यांनीही ‘हिंदु समाज लव्ह जिहाद, गोहत्या, धर्मांतर अशा अनेक समस्यांनी त्रस्त आहे. त्यामुळे हिंदु जनजागृती समितीने चालू केलेल्या हिंदु राष्ट्रजागृती अभियानात प्रत्येक हिंदूने सहभागी होणे आवश्यक  आहे’, पवई विभागात माहिती अधिकार कार्यशाळा घेण्याचे त्यांनी  निश्‍चित केले. दुर्वाप्रिय गणेश मंदिराचे विश्‍वस्त श्री. विलास मारलेकर यांनी मंदिरात असा उपक्रम झाल्याविषयी आनंद व्यक्त केला.

ऐरोली येथील श्री महादेव मंदिरात स्वच्छता केल्यावर वातावरणात पुष्कळ पालट !

१ मे या दिवशी येथील धर्मप्रेमी महिला, हितचिंतक, बालसाधक यांनी महादेव मंदिराची स्वच्छता केली. या वेळी दर्शनासाठी आलेले एक भाविक विषय ऐकून स्वत:हून स्वच्छतेमध्ये सहभागी झाले. त्यांनी ‘हे उपक्रम यापुढेही राबवावेत,’ असे सांगितले. मंदिर स्वच्छतेनंतर मंदिरातील वातावरणात पुष्कळ पालट झाल्याचे उपस्थितांना जाणवले.   ३ मे या दिवशी सेक्टर १७ येथील श्री दत्तमंदिरात भगवान दत्तात्रेयांच्या चरणी पुरोहितांकडून साकडे घालण्यात आले. या वेळी ३ धर्मप्रेमी महिला आणि ३ साधक उपस्थित होते.

संभाजीनगर येथील ग्रामदैवत श्री सुपारी मारोतिच्या चरणी हिंदुत्वनिष्ठांचे साकडे

संभाजीनगर : श्री. सचिन खैरे यांच्यासह अन्य हिंदुत्वनिष्ठ, भक्त यांनी संभाजीनगर येथील ग्रामदैवत श्री सुपारी मारोतिच्या चरणी भावपूर्ण साकडे घातले.

यासह संभाजीनगर येथील संकटमोचन मारोति मंदिर, बालाजी मंदिर, कानिफनाथ मंदिर येथेही साकडे घालण्यात आले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *