पणजी : उत्तर गोवा जिल्हा न्यायदंडाधिकारी यांनी प्रखर हिंदुत्वनिष्ठ तथा श्रीराम सेनेचे अध्यक्ष श्री. प्रमोद मुतालिक आणि त्यांचे सहकारी यांच्या उत्तर गोवा जिल्हा प्रवेशबंदीमध्ये वाढ केली आहे. दक्षिण गोवा जिल्हा न्यायदंडाधिकार्यांनी यापूर्वीच प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. प्रमोद मुतालिक आणि त्यांचे सहकारी यांच्या दक्षिण गोव्यातील प्रवेशबंदीत वाढ केलेली आहे.
याविषयीच्या आदेशात म्हटले आहे की, १५ मे २०१८ पासून पुढील ६० दिवसांसाठी ही बंदी वाढवण्यात आली आहे. प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. प्रमोद मुतालिक आणि त्यांचे सहकारी यांची प्रक्षोभक विधाने किंवा भाषण यांमुळे समाजातील काही गटांच्या भावना दुखावल्या जाऊन दंगल घडू शकते. यामुळे सामाजिक सलोखा बिघडला जाण्याची शक्यता आहे. (क्रॉस तोडफोड प्रकरणातील चर्चप्रणीत सत्यशोधन समितीचा हिंदूंच्या विरोधातील धादांत खोटा अहवाल, बिलिव्हर्सच्या धर्मांतराच्या कारवाया यांमुळे नाही, तर म्हणे श्री मुतालिक यांच्या कथित प्रक्षोभक विधानांमुळे सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता आहे. सरकारचा हा कारभार म्हणजे अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनाची परिसीमाच ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात