पंढरपूर : सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा जन्मोत्सव वैशाख कृष्ण पक्ष सप्तमी म्हणजेच ७ मे या दिवशी झाला. जन्मोत्सवाच्या निमित्ताने परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या दीर्घायुष्यासाठी १० मे या दिवशी सायंकाळी ६.३० वाजता येथीले श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात नामदेव पायरी येथे सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि भाविक यांच्या वतीने साकडे घालण्यात आले.
मंदिर समितीच्या कार्यालयात अधिकार्यांना भेटून वरील विषय सांगितल्यावर त्यांनी मंदिरात श्री विठ्ठलाच्या चरणांचे दर्शन घेण्याची कार्यकर्त्यांना अनुमती दिली.
या वेळी श्री विठ्ठलाच्या मूर्तीला कार्यकर्त्यांनी पुष्पहार अर्पण करून हिंदु राष्ट्रासाठी प्रार्थना केली. या वेळी वातावरण काही क्षण पालटले, तर काहींनी निराळा सुगंध अनुभवला. ‘साक्षात् श्री विठ्ठलाच्या चरणांचे दर्शन झाल्याने ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या दीर्घायुष्यासाठी साकडे घालतांना केलेली प्रार्थना श्री विठ्ठलापर्यंत पोहोचली’, असे भाविकांनी अनुभवले.
या वेळी हिंदु महासभेचे श्री. बाळासाहेब डिंगरे, पेशवा युवा मंचचे श्री. गणेश लंके, वारकरी संप्रदाय पाईक संघाचे ह.भ.प. रामकृष्ण वीर महाराज, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे रामेश्वर कोरे, सामाजिक कार्यकर्ते श्री. चंद्रशेखर नागटिळक, बजरंग दल शहराध्यक्ष श्री. सुनील बाबर, सनातन संस्थेच्या सौ. सुवर्णा पेठकर, सौ. सुनंदा पाटील, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शशिशेखर पाटील, राजेंद्र माळी, मोहन लोखंडे, वामन बेणारे यांसह भाविक उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात