-
धर्मांधांवरील कारवाईसाठी प्रभारी (तात्पुरता पदभार) पोलीस आयुक्तांना निवेदन
-
शिवसेनेच्या नगरसेवकांना अटक
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीतून सिद्ध झालेले शिवसैनिकच अशी चेतावणी देऊ शकतात. यासाठीच हिंदूंना शिवसेनेचा आधार वाटतो !
दंगल धर्मांधांनी केली आणि हिंदूंनी रक्षणासाठी प्रतिकार केला ! असे असतांना निधर्मीवादाच्या नावाखाली ‘समतोल’ साधण्यासाठी पोलीस हिंदूंच्या लोकप्रतिनिधींना अटक करतात, हे संतापजनक ! ‘आम्ही हिंदूंचे रक्षण करणार नाही आणि इतरांनाही ते करू देणार नाही’, अशी पोलिसांची भूमिका येथे दिसून येते !
संभाजीनगर : क्षुल्लक कारणावरून ११ मेच्या रात्री धर्मांधांनी शहरात दंगल घडवली. धर्मांधांच्या झुंडी रस्त्यावर उतरून उत्पात माजवत असतांना आम्ही हिंदूंचे संरक्षण करायचे नाही का ? भविष्यात कुणी हिंदूंच्या वस्त्यांना लक्ष्य केल्यास त्यांना शिवसेनेकडून ‘जशास तसे’ उत्तर दिले जाईल, अशी चेतावणी शिवसेनेच्या वतीने देण्यात आली. (एकही हिंदु लोकप्रतिनिधी हिंदूंच्या रक्षणार्थ कृती करणे सोडाच; पण असे वक्तव्यही करत नाहीत. या उलट मुसलमान लोकप्रतिनिधी त्यांच्या समाजाच्या रक्षणार्थ सदैव तत्पर असतात ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
दंगलीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांना निवेदन देऊन धर्मांधांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. या वेळी शिवसेनेचे नेते खासदार चंद्रकांत खैरे, तसेच अन्य मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवसेनेच्या मागण्या
१. धर्मांधांना कह्यात घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी.
२. दंगलीची झळ पोहोचलेल्या हिंदूंच्या वस्त्यांना तातडीने संरक्षण देण्यात यावे.
३. जगनलाल छगनलाल बन्सिले (वय ७० वर्षे) यांना जाळणार्यांवर खुनाचा गुन्हा नोंदवावा.
पोलिसांवर दगडफेक करणार्या ८ धर्मांधांना न्यायालयीन कोठडी
संस्थान गणपति मंदिर परिसरात पोलिसांवर दगडफेक करून प्राणघातक आक्रमण करणार्या १४ धर्मांधांना न्यायालयात उपस्थित करण्यात आले. त्यांपैकी ८ धर्मांधांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.
धर्मांधांचा कावेबाजपणा !
या वेळी शेख अरबाज शेख रहीम याने तो ‘अल्पवयीन’ असल्याचा दावा केला होता; मात्र त्याच्या वैद्यकीय अहवालानुसार तो २० वर्षांचा असल्याचे आढळून आले.
दंगलीच्या चौकशीसाठी विशेष तपास पथकाची स्थापना !
दंगलीप्रकरणी अडीच ते ३ सहस्र समाजकंटकांच्या विरुद्ध वेगवेगळे सात गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. त्यांच्या तपासासाठी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी ५० अधिकारी आणि कर्मचारी यांचे विशेष तपास पथक (एस्आयटी) स्थापन केले. दंगेखोरांविरुद्ध अधिकाधिक पुरावे गोळा करून कडक कारवाईचा आदेश देण्यात आला आहे.
दंगलीप्रकरणी १५ मे या दिवशी सकाळी शिवसेनेचे नगरसेवक श्री. राजेंद्र जंजाळ यांची क्रांतीचौक पोलीस ठाण्यात विशेष तपास पथकाने चौकशी केली आणि त्यांना अटक केली. दंगलीच्या काळात त्यांनी दगडफेक केल्याचे ‘सीसीटीव्ही’त दिसल्याने पोलिसांनी त्यांना कह्यात घेतल्याचे म्हटले जात आहे. चौकशीच्या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, माजी खासदार प्रदीप जैस्वाल हेही उपस्थित होते. जंजाळ यांना अटक केल्यावर पोलीस एम्आयएम्चे नगरसेवक फिरोज खान यांनाही अटक करणार होते; मात्र पोलीस घरी येण्याआधीच त्यांनी पलायन केले होते. ताज्या वृत्तानुसार ते पोलिसांना शरण आले आहेत.
शिवसेनेच्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया
आता हिंदू मार खाणार नाहीत ! – प्रदीप जैस्वाल, महानगरप्रमुख
दंगल पूर्वनियोजित होती. शिवसैनिकांनी दंगलखोरांची टोळधाड रोखली नसती, तर शहरात वेगळीच स्थिती निर्माण झाली असती. आता हिंदू मार खाणार नाहीत. जशास तसे उत्तर दिले जाईल.
संभाजीनगरातील दंगल म्हणजे घातपातच ! – त्र्यंबक तुपे, माजी महापौर
संकटात सापडलेल्यांच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरणे हा गुन्हा आहे का ? जे घडले, ते भयंकर होते. हा सगळा प्रकार म्हणजे घातपातच आहे.
या झुंडी आल्या कुठून ? – बाळासाहेब थोरात, शहरप्रमुख
गल्लीबोळातून अचानक या झुंडी कुठून आल्या ? शहागंजातील जैन धर्मशाळेत दुसर्या मजल्यावर काही जण भीतीने घाबरून लपले. शिवसैनिकांनी धीर देऊन त्यांना बाहेर काढले; अन्यथा आक्रितच घडले असते.
दंगल म्हणजे युद्धच होते ! – अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख
जे घडले, ती दंगल नसून युद्धच होते. संपूर्ण शहरच पेटवण्याचा उद्देश होता. आम्ही पोलिसांना संरक्षण दिले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात