नवी देहली : तिबेटचे माजी पंतप्रधान प्रा. सॅमधोंग समंढोंग रिनपोचे यांची हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी येथील इंडियन इंटरनॅशनल सेंटरमध्ये सदिच्छा भेट घेतली. समिती करत असलेल्या राष्ट्र आणि धर्म विषयक कार्याची त्यांना या वेळी माहिती करून देण्यात आली. तिबेटच्या स्वातंत्र्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रा. रिनपोचे करत असलेल्या प्रयत्नांना समर्थन देण्यासाठी काय प्रयत्न करू शकतो, यांवर दोघांमध्ये चर्चा करण्यात आली.
रिनपोचे यांनी तिबेटसाठी जो त्याग केला आणि आणि समर्पित भावाने जे कार्य केले आहे, यासाठी समितीकडून सद्गुरु डॉ. पिंगळे यांनी त्यांचा शाल आणि सनातननिर्मित ग्रंथ देऊन सन्मान केला.