संभाजीनगर : शहरात ११ मे च्या रात्री झालेल्या दंगलीत घायाळ झालेल्या पोलिसांना वाचवण्याचे काम शिवसैनिकांनीच केले. पेट्रोल बॉम्ब, दगडफेक आणि जाळपोळ करणारे कोण आहेत, हे प्रत्यक्ष पोलिसांनी पाहिले आहे, तरीही पोलीस ‘एम्आयएम्’च्या इशार्यावर केवळ शिवसैनिकांवरच कारवाई करणार असतील, तर शिवसेना तीव्र आंदोलन छेडेल. पोलिसांनी दबावाखाली येऊन शिवसैनिकांवर कारवाई करू नये, असे शिवसेनेचे नेते आणि खासदार श्री. चंद्रकांत खैरे यांनी म्हटले आहे.
शिवसैनिकांना अटक केल्यास आंदोलन करू ! – प्रदीप जैस्वाल, महानगरप्रमुख, शिवसेना
दंगलीप्रकरणी काँग्रेस आणि ‘एम्आयएम्’ पक्षाच्या दबावाखाली येऊन शिवसैनिकांचे अटकसत्र चालू केल्यास शिवसेना हे कदापि सहन करणार नाही. शिवसैनिकांसाठी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
पोलिसांचा हिंदुद्वेष आणि दुटप्पीपणा !
एका तक्रारीवरून पोलिसांनी शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांना अटक केली; मात्र दंगलखोरांनी जगनलाल बन्सिले यांना जिवंत जाळले. या धर्मांधांच्या विरोधात पोलिसांनी कोणताही गुन्हा नोंदवलेला नाही. बन्सिले यांची अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
हत्यार ठेवण्याची अनुमती देण्याची महिलांची पोलीस आयुक्तांकडे मागणी
दंगलखोरांवर कारवाई करा, अन्यथा आमच्या रक्षणासाठी आम्हाला हत्यार ठेवण्याची अनुमती द्या’, अशी मागणी महिलांच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली.
दंगलीत १० कोटी रुपयांची हानी !
दंगल घडवणार्यांकडूनच ही हानी वसूल करायला हवी !
दंगलीमध्ये घरे, वाहने आणि दुकाने यांची अनुमाने १० कोटी २१ लाख १५ सहस्र ६०० रुपयांची हानी झाली, असे संयुक्त पथकाच्या पंचनाम्यांनंतर स्पष्ट झाले. हानीचा अहवाल जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्याकडे सादर करण्यात येणार असून त्यानंतर तो शासनाला पाठवण्यात येणार आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात