Menu Close

संभाजीनगर येथील दंगलीच्या प्रकरणात शिवसैनिक लक्ष्मीनारायण बाखरिया यांना अटक

पोलिसांच्या मोगलाईमुळे हिंदू संतप्त

‘आम्ही हिंदूंचे रक्षण करणार नाही आणि इतरांनाही ते करू देणार नाही’, ही पोलिसांची हिंदुद्वेषी मनोवृत्ती येथे दिसून येते !

संभाजीनगर : येथे ११ मे च्या रात्री दंगल घडवून ७२ घंटे शहर वेठीस धरणारे धर्मांध मोकाट फिरत आहेत; मात्र त्यांना अटक न करता पोलिसांनी दंगलीत माता-भगिनींचे रक्षण करणारे शिवसैनिक लक्ष्मीनारायण बाखरिया उपाख्य लच्छू पहिलवान यांना १६ मे या दिवशी अटक केली. या आधी शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या विरोधात दंगल घडवण्याची कलमे लावण्यात आली होती. दंगेखोरांना पहाताच पसार झालेले पोलीस तक्रार देण्यासाठी मात्र समोर आले. पोलिसांच्या या मोगलाईमुळे शहरातील हिंदू संतप्त झाले आहेत. ‘दंगलीच्या प्रकरणी पोलीस आणि दंगेखोर यांच्या विरोधात १९ मे या दिवशी शिवसेनेच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे’, असे शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी सांगितले आहे.

धमक असेल, तर पोलिसांनी दंगलखोरांना शोधून त्यांना अटक करावी ! – संतप्त महिलांची मागणी

असे महिलांनी सांगावे लागणे, हे पोलीस प्रशासनाला लज्जास्पद !

धर्मांधांना मोकाट सोडून ज्यांनी आमचे रक्षण केले, त्यांनाच अटक करण्याचा सपाटा पोलिसांनी लावला आहे. धमक असेल, तर पोलिसांनी दंगलखोरांना शोधून त्यांना अटक करावी, अशा शब्दांत राजाबाजारमधील महिलांनी संताप व्यक्त केला. महिलांनी बालाजी मंदिरात येऊन निषेध पुकारला. दंगलीच्या दिवशी सुटीवर असणार्‍या पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली घाडगे या तेथे आल्या. त्या वेळी संतप्त महिलांनी त्यांना ‘दंगलीच्या काळात पोलीस कुठे होते ?’, असा प्रश्‍न विचारला. तेव्हा पोलीस उपायुक्तांनी सारवासारव करून तेथून काढता पाय घेतला.

दंगलीच्या काळात गुप्त बातमीदार आणि विशेष पोलीस अधिकारी यांच्याकडून ठोस माहिती मिळाली नाही !

अशांची नेमणूक कुणी केली ?

तत्कालीन पोलीस आयुक्तांनी शहरातील सर्वसामान्य नागरिकांतून विशेष पोलीस अधिकार्‍यांची (एस्पीओ) नियुक्ती केली होती. त्यांनी पोलिसांना गुप्त माहिती पुरवणे अपेक्षित होते; परंतु दंगलीच्या तपासात आतापर्यंतगुप्त बातमीदार, विशेष पोलीस अधिकारी यांच्याकडून कुठलीही ठोस माहिती मिळाली नाही, असे पुढे आले आहे.

‘सीसीटीव्ही फुटेज’मधील ‘डेटा डिलीट’

राजाबाजार ते नवाबपुरा आणि गुलमंडी भागातील जाळपोळीचे ‘सीसीटीव्ही फुटेज’ पोलिसांना मिळाले; पण ते जप्त करण्यापूर्वीच त्यातील माहिती ‘डिलीट’ करण्यात आली होती. त्यामुळे पोलीसही गोंधळून गेले. (हे कुकृत्य कोणी केले असेल, हे वेगळे सांगायला नको. पोलिसांपेक्षा असे समाजकंटक अधिक हुशार आहेत, असे समजायचे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

‘सीसीटीव्ही’ कॅमेरे लावले असूनही अशी स्थिती उद्भवणे दुर्दैवी आणि लज्जास्पद !

५ दिवस प्रयत्न करूनही अपेक्षित ‘व्हिडिओ’ किंवा छायाचित्रे मिळत नसल्यामुळेच पोलिसांनी १६ मे या दिवशी प्रसिद्धीपत्रकाद्वारे नागरिकांनाच दंगलीचे ‘व्हिडिओ’ किंवा छायाचित्रे पाठवण्याचे आवाहन केले. (सर्व काही नागरिकांनीच करायचे असेल, तर पोलीस प्रशासनाचा खर्चिक डोलारा हवाच कशाला ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

याला पोलिसांचा दुटप्पीपणा म्हटल्यास चुकले कुठे ?

हिंदूंचा जमाव असलेले सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले; पण धर्मांधांनी केलेल्या विध्वंसाचे फुटेज पोलिसांना मिळालेले नाही.

दंगलीतील काही पुरावे पोलिसांकडून नष्ट !

धर्मांधांच्या दंगलखोरीचे पुरावे नष्ट करणारे पोलीस भारताचे कि पाकचे ?

नवाबपुर्‍यात दंगलखोरांनी रॉकेलचा पिंप ढकलत राजाबाजारपर्यंत आणला होता. पोलिसांनी तो कह्यात घेऊन त्यातील रॉकेल रस्त्यावर ओतून दिले. ‘पिंपाचा पंचनामा का करण्यात आला नाही ?’, असा प्रश्‍न जनतेकडून विचारला जात आहे. नवाबपुर्‍यात दगडफेक करण्यासाठी एका खांबाला मोठी गुलेल बांधण्यात आली होती. ‘ती पोलिसांनी कुणाच्या सांगण्यावरून काढली ?’, असेही हिंदूंकडून विचारले जात आहे. ‘धर्मांधांना वाचवण्यासाठी पोलिसांकडून पुरावे नष्ट केले जात आहेत’, अशी संतप्त प्रतिक्रिया हिंदूंकडून व्यक्त केली जात आहे.

दगडांचा खच साठवणार्‍या इमारतीच्या मालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात येणार

नवाबपुर्‍यातील ज्या घराच्या छतावरून लोखंडी शिडीला गलोल लावून दगडफेक करण्यात आली, तसेच पेट्रोलबॉम्ब आणि पेटलेल्या गॅसच्या छोट्या टाक्या उडवण्यात आल्या होत्या. त्या गच्चीची पोलिसांनी पाहणी केल्यावर तेथे दगडांचा खच पडल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यामुळे त्या इमारतीच्या मालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

शिवाजीनगर येथे बंद !

शिवसेनेचे नगरसेवक राजेंद्र जंजाळ यांना अटक केल्याच्या निषेधार्थ सलग दुसर्‍या दिवशी शिवाजीनगर येथे दिवसभर बंद पाळण्यात आला. सायंकाळीही कुठलेही दुकान उघडले नाही.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *