गोवंशियांची हत्या करणार्यांना अद्यापही कठोर शासन झालेले पहायला मिळत नाही. त्यामुळेच गोवंशियांच्या हत्या कायदा होऊनही अद्याप चालूच आहेत. कठोर शासन झाले, तरच कायद्याचे उल्लंघन करण्याचे आणि हिंदूंच्या धर्मभावना दुखावण्याचे धाडस कुणी करणार नाही !
सातारा : येथील कुरेशीनगरमधील पशूवधगृहात अवैधपणे गोवंशाची हत्या चालू असतांना १६ मेच्या रात्री पोलिसांनी धाड टाकली. या वेळी २१ जिवंत गोवंश आणि ८० मृत गोवंशियांचे अवयव आढळले. या प्रकरणी धर्मांध इम्तियाज कुरेशी याच्याविरुद्ध गुन्हा प्रविष्ट करण्यात आला; मात्र त्याचे सहकारी पसार झाले. (पोलिसांची (अ)कार्यक्षमता ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) हत्या झालेल्या गोवंशात देशी आणि खिलार गायी, जर्सी गायी, जर्सी बैल होते. पोलिसांनी जिवंत गोवंश कह्यात घेतले आहेत. (काही वर्षांपूर्वी हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी संघटना यांनी या पशूवधगृहाच्या बंदीसाठी शर्थीचे प्रयत्न केले होते. त्यानंतर याला यशही प्राप्त झाले; मात्र वरील घटनेने पशूवधगृहावरील बंदी ही केवळ कागदोपत्रीच असल्याचे उघड झाले. त्यामुळे आतापर्यंत किती गोवंशांची हत्या करण्यात आली, याची चौकशी व्हायला हवी, तसेच या प्रकाराला पाठीशी घालणार्यांनाही कठोर शासन व्हायला हवे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
0 Comments