विनाअनुमती ‘हिंदु शक्ती मोर्चा’ काढू ! – शिवसेनेचे खासदार श्री. चंद्रकांत खैरे
धर्मांधांना दंगल घडवण्याची मोकळीक द्यायची आणि हिंदूंना साधा निषेधही नोंदवू द्यायचा नाही, ही पोलिसांची वृत्ती येथे दिसून येते ! असे रझाकारी पोलीस हिंदूंचे कधीही रक्षण करणार नाहीत, हेच खरे !
संभाजीनगर : शहरात ११ मे च्या रात्री झालेल्या दंगलीचा निषेध करण्यासाठी आणि पोलिसांची चौकशी करावी, यासाठी शिवसेना १९ मे या दिवशी काढणार्या हिंदु शक्ती मोर्च्याला पोलिसांनी अनुमती नाकारली. दंगलीत पोलिसांना आम्हीच संरक्षण दिले. आता सरकारच्या दबावाखाली पोलीस आमच्यावर गुन्हे नोंद करत आहे. त्यामागे पोलिसांतील अंतर्गत वादही आहे, असे शिवसेनेने म्हटले आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे रस्त्यावर येऊन शिवसेना काय चीज आहे, हे दाखवून देऊ, अशी चेतावणी शिवसेनेचे खासदार श्री. चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे.
पोलीस अनुमती देत नसल्याने विनाअनुमती मोर्चा काढण्याची आमची सिद्धता आहे, असे खैरे यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सांगितले. मुसलमानबहुल भागात काँग्रेसचे वर्चस्व वाढत असल्याने एम्आयएम् अस्वस्थ होती. त्यामुळे तिने ही दंगल घडवली. आम्ही कल्पना देऊनही पोलिसांनी दुर्लक्ष केले. पोलिसांनी हस्तक्षेप केला असता, तर दंगल झालीच नसती. पोलिसांना वाचवणारे शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ यांना लगेच अटक झाली; परंतु मतीन (दंगल घडवणारा धर्मांध) कोठे पळून गेला ?, असा प्रश्न श्री. खैरे यांनी या वेळी उपस्थित केला.
३५० प्लास्टिक गोळ्या कोठे गेल्या ?
दंगल शमवण्यासाठी ३५० प्लास्टिक गोळ्या वापरल्याचा पोलिसांचा दावा आहे. या प्लास्टिकच्या गोळ्या कोणाला दिसल्या नाहीत. ३५० गोळ्या किमान १० जणांना तरी लागल्या असतील. एक तरुण वगळता त्या कोणालाही लागल्याचे दिसून येत नाही. या गोळ्या कोठे गेल्या ?, असा प्रश्न शिवसेना संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर यांनी केला.
धर्मांध दंगल करत असल्याचे दिसू नये; म्हणून पोलिसांनीच सीसीटीव्हीचे चित्रीकरण गायब केले ! – शिवसेना जिल्हाप्रमुख अंबादास दानवे
आयुक्त शहरात नाहीत. दोन उपायुक्त रजेवर आहेत. गुन्हे शाखेच्या निरीक्षकपदावरून अधिकार्यांत वाद आहे. या राजकारणातून रॉकेलमाफिया आणि पत्ते क्लब चालवणारे यांच्या साहाय्याने ही दंगल पोलिसांनी घडवली. शहरात विशेष पोलीस पथक असतांना जालन्याहून तुकडी मागवली. धर्मांध तरुण दंगल करतांना दिसू नये; म्हणून पोलिसांनीच सीसीटीव्हीचे चित्रीकरण गायब केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात