Menu Close

मेरठ : हिंदुबहुल भागातील मकबर्‍यामध्ये नमाजपठण करू देण्यास हिंदु संघटनांचा विरोध

हिंदूंनी मुसलमानबहुल भागात पूजा आणि आरती चालू केली, तर चालेल का ? – भाजपचा प्रश्‍न

भाजप सत्तेवर असतांना असे प्रकार रोखले का जात नाहीत ? यासाठी त्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांना विरोध का करावा लागतो ?

मेरठ (उत्तरप्रदेश) : येथील शास्त्रीनगरमध्ये १६ मेच्या रात्री भाजपच्या नेतृत्वाखाली काही हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी येथील मकबर्‍यामध्ये नमाजपठण करण्यावर विरोध केला. त्यामुळे येथे तणाव निर्माण होऊन दगडफेक चालू झाली. त्यात २ जण घायाळ झाले. आता येथे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

१. भाजपने म्हटले की, जेथे मुसलमान नमाजपठण करणार होते, ती जागा हिंदुबहुल सेक्टर ३ मधील गोल मंदिराजवळ आहे. येथे पहिल्यांदाच नमाजपठण करण्यात येणार होते. आमचा नमाजपठणाला विरोध नाही; मात्र त्या नावाखाली येथे नवीन ‘परंपरा’ चालू होऊ देणार नाही. जर मोठ्या संख्येने हिंदू मुसलमानबहुल भागात जाऊन पूजा किंवा आरती करू लागले, तर ते चालेल का ?

२. मुसलमानांनी मात्र भाजपचा आरोप खोडून काढत ‘यापूर्वीही आम्ही येथे नमाजपठण केले आहे’, असे म्हटले आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *