श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर (जिल्हा नगर) : १५ मे या दिवशी येथील शनिदेवाला साकडे घालण्यात आले. या वेळी सरपंच सौ. पुष्पा बानकर, स्थानिक बचत गटाच्या महिला, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, हिंदु जनजागृती समिती यांचे कार्यकर्ते आणि सनातनचे साधक उपस्थित होते.
परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्रात ठिकठिकाणी देवतांच्या चरणी ‘हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी आणि परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांना दीर्घायुष्य लाभावे’, असे साकडे घालण्यात येत आहे. भावपूर्णपणे केलेल्या प्रार्थनेमुळे हिंदूंचे आध्यात्मिक स्तरावर संघटन होत असल्याने हा उपक्रम म्हणजे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या विशाल कार्यातील एक सकारात्मक टप्पा ठरत आहे !