वाढते बलात्कार आणि लैंगिक शोषण यांना आळा घालण्यासाठी अश्लील संकेतस्थळांवर बंदी घाला ! – राजन बुणगे, हिंदु जनजागृती समिती
सोलापूर : कठुआ आणि उन्नाव येथील बलात्कारांच्या घटनांनंतर केंद्र शासनाने १२ वर्षांखालील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्याला फाशीची शिक्षा देण्याचा महत्त्वपूर्ण अध्यादेश पारित केला. अध्यादेशावरील स्वाक्षरी सुकली नसेल, तोच उत्तरप्रदेशातील गाझियाबाद येथील मदरशामध्ये ११ वर्षांच्या अल्पवयीन हिंदु मुलीवर धर्मांध मौलवी आणि अल्पवयीन मुलगा यांनी सामूहिक बलात्कार केला. बलात्कारांच्या घटनांमध्ये वाढ होण्यामागे अश्लील संकेतस्थळे (पॉर्नसाइटस्) पहाणे हे मुख्य कारण आहे. त्यामुळे अश्लील संकेतस्थळांवर (‘पॉर्नसाईटस्’वर) पूर्णतः बंदी घालणे आवश्यक आहे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे यांनी केली. ते १६ मे या दिवशी येथे झालेल्या राष्ट्रीय हिंदू आंदोलनात बोलत होते.
या वेळी माजी नगरसेवक श्री. बापू ढगे, सौ. राजश्री देशमुख, सौ. अनिता बुणगे, श्री. विनोद रसाळ, श्री. दत्तात्रय पिसे यांनीही मनोगत व्यक्त केले. आंदोलनानंतर अप्पर जिल्हाधिकारी श्री. रामचंद्र शिंदे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी श्री. जनार्दन चाफकरंडे, श्री. जनार्दन कारंडे, श्री. विकी दिल्लीवाले, श्री. अर्जुनसिंग शिवशिंगवाले, योग वेदांत सेवा समितीचे साधक सौ. कांता पाटील, सौ. पाणीभाते यांसह मोठ्या संख्येने धर्मप्रेमी उपस्थित होते.