- गोव्यातील भाजप शासनाचा हिंदुद्वेष !
- बिलिव्हर्सच्या फेरीला अनुमती दिल्यास फेरी उधळून लावण्याची गोमंतक हिंदु प्रतिष्ठानची चेतावणी !
संयत मार्गाने फेरी काढून धर्मांतरबंदी कायद्याची मागणी करणार्या हिंदुत्वनिष्ठांच्या मिरवणुकीला अनुमती नाकारणारे प्रशासन हिंदूंना आमिषे दाखवून त्यांचे धर्मांतर करणार्या बिलिव्हर्सला रोखणार का ?
पणजी : बिलिव्हर्सच्या नावाखाली हिंदूंमध्ये फूट पाडणार्या डॉम्निक दांपत्यावर शासनाने लवकरात लवकर कारवाई करावी, तसेच राज्यात हिंदु धर्मांतरविरोधी कायदा लागू करावा, या मागणीसाठी २० मे या दिवशी शिवोली येथील स्वामी समर्थ मठापासून काढण्यात येणार्या हिंदु चेतना मिरवणुकीला प्रशासनाने ऐनवेळी अनुमती नाकारली. त्यामुळे त्याच दिवशी सायंकाळी पणजी बसस्थानकात हिंदुत्वनिष्ठांनी निषेध सभा घेतली. सभेला मोठ्या संख्येने धर्माभिमानी उपस्थित होते. तत्पूर्वी मिरवणुकीला अनुमती नाकारल्यानंतर हिंदुत्वनिष्ठांनी एकत्र जमून श्री बोडगेश्वराला गार्हाणे घातले.
हिंदुत्वनिष्ठांनी आयोजित केलेल्या हिंदु चेतना मिरवणुकीला आव्हान देणारी फेरी २३ मे या दिवशी बिलिव्हर्सच्या अनुयायांकडून काढण्यात येणार आहे. प्रशासनाने बिलिव्हर्सच्या फेरीलाही अनुमती नाकारावी. फेरीला अनुमती दिल्यास ती उधळून लावण्यात येईल, अशी चेतावणी गोमंतक हिंदु प्रतिष्ठानने दिली आहे. हिंदूंचे धर्मांतर करणार्या डॉम्निक यांच्या वाढदिवसाला उपस्थित रहाणारे जलस्रोतमंत्री विनोद पालयेकर यांचाही प्रतिष्ठानने निषेध केला.
क्षणचित्र
निषेध सभेच्या वेळी पोलिसांचा मोठा फौजफाटा उपस्थित होता.
पणजी येथील निषेध सभेच्या वेळी हिंदुत्वनिष्ठांनी मांडलेले जाज्वल्य विचार
पणजी येथील निषेध सभेला गोमंतक हिंदु प्रतिष्ठानचे प्रमुख श्री. शैलेंद्र वेलिंगकर, गोमंतक मंदिर महासंघाचे सदस्य श्री. जयेश थळी, हिंदु जनजागृती प्रणित रणरागिणी शाखेच्या सौ. राजश्री गडेकर, शिवसेनेचे माजी गोवा राज्यप्रमुख श्री. रमेश नाईक, गोमंतक हिंदु प्रतिष्ठानच्या कार्यकारी सचिव सौ. निशा वेर्णेकर आणि हृषिकेश येथील संन्यासी पू. हरि श्रद्धानंद आदी या वेळी उपस्थित होते. या मान्यवरांची या वेळी त्यांचे विचार व्यक्त केले.
श्री. शैलेंद्र वेलिंगकर यांनी धर्मांतरविरोधी आंदोलन उभे रहाण्यामागची पार्श्वभूमी सर्वांसमोर मांडली.
बिलिव्हर्सवाल्यांनी हिंदूंच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये ! – पू. हरि श्रद्धानंद
आपले सैनिक देशाच्या सीमांचे रक्षण करून राष्ट्राचे रक्षण करत आहेत. सैनिकांप्रमाणेच आपण हिंदूंनी धर्माचे रक्षण करायला हवे. मी एक संन्यासी आहे. संन्यासी भजन कीर्तनासमवेत वेळप्रसंगी धर्मरक्षणासाठी शस्त्र हाती घेण्यास मागेपुढे पहाणार नाहीत. धर्मांतर हा राष्ट्रद्रोह आहे. गोव्यात जर धर्मांतराचा हा प्रकार असाच चालू राहिला, तर आम्ही हृषिकेशमधील साधू एकत्र येऊन गोव्यातील हा धर्मांतराचा प्रकार हाणून पाडू. हिंदू सहनशील आहेत याचा अर्थ कोणी हिंदूंना भ्याड समजू नये. हिंदूंच्या सहनशीलतेचा कोणी अंत पाहू नये.
हिंदूंना धर्मशिक्षण देणे आवश्यक ! – सौ. राजश्री गडेकर
बिलिव्हर्स पंथीयांसमवेत मुसलमानही हिंदूंचे धर्मांतर करत आहेत. हिंदूना धर्मशिक्षण नसल्यामुळे हिंदू धर्मांतराला बळी पडत आहेत. नागालॅण्ड, मिझोरम या ठिकाणी हिंदूंचे मोठया प्रमाणात धर्मांतर झाले आहे. तेथील धर्मांतरित हिंदू हे राष्ट्रविरोधी कृत्ये करत आहेत. त्यामुळे धर्मांतर रोखण्यासाठी हिंदूंना धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे. प्रत्येक हिंदूने आचारधर्माचे पालन केले पाहिजे.
हिंदूंचे धर्मांतर करणार्यांनो, खबरदार ! – रमेश नाईक
हिंदूंचे धर्मांतर करणार्यांनो खबरदार ! हिंदूंच्या धर्मांतराचे प्रकार यापुढे खपवून घेतले जाणार नाहीत. अफझलखानाचा कोथळा बाहेर काढणार्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन आम्ही हिंदू निर्णायक कृती करू.
गोव्यात अजूनही धर्मांतरविरोधी कायदा नसणे दुर्दैवी ! – जयेश थळी
गोव्यातील हिंदूंचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर करून त्यांचा अनन्वित छळ करणार्या पोर्तुगिजांना हाकलून लावल्यानंतर स्वतंत्र गोव्यात लगेचच धर्मांतरविरोधी कायदा होणे आवश्यक होते. दुर्दैवाने गोवा मुक्त होऊन ५७ वर्षे झाली, तरी असा कायदा अजून झालेला नाही. आतातरी शासनाने हा कायदा करायला हवा.
क्षणचित्र
पू. हरि श्रद्धानंद यांनी बिलिव्हर्सच्या विरोधात लढण्यासाठी आध्यात्मिक बळ आवश्यक असल्याचे सांगून उपस्थितांकडून नामजप करवून घेतला.