भारतातील बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमान यांनी घुसखोरी केल्याने जी राष्ट्रविरोधी समस्या उद्भवली आहे, त्यावरही लक्ष देण्याची आवश्यकता आहे, हे प्रियांका चोप्रा यांना ठाऊक आहे का ?
ढाका (बांगलादेश) : मी ‘युनिसेफ’च्या वतीने बांगलादेशमधील रोहिंग्या मुसलमानांच्या शरणार्थी केंद्राच्या दौर्यावर आहे. (‘युनिसेफ’ने कधी विस्थापित काश्मिरी हिंदूंच्या शरणार्थी केंद्राचा दौरा केला आहे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) येथील मुले बेघर झाली आहेत. जगाने त्यांची काळजी घेण्याची आवश्यकता आहे. आम्हाला त्यांची काळजी घ्यावी लागेल, असे ‘ट्वीट’ भारतीय अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिने केले आहे. (प्रियांका चोप्रा हिने कधी भारतातील विस्थापित हिंदूंविषयी असे विधान केले आहे का ? त्यांची समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) तसेच तिने काही छायाचित्रेही प्रसारित केली आहेत. ती युनिसेफची ‘जागतिक सद्भावना दूत’ म्हणून येथे आली आहे. प्रियांका गेल्या अनेक वर्षांपासून युनिसेफशी जोडलेली आहे. गेल्या वर्षी ती जॉर्डनमध्ये सीरियातील शरणार्थी मुलांना भेटण्यासाठी गेली होती.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात