भारतातील एकतरी इस्लामी संघटना कधी अशी मागणी करील का ? उलट मदरशांवर राष्ट्रध्वज लावण्याचा उत्तरप्रदेश सरकारने आदेश दिल्यावर त्याचा विरोध करण्यात आला होता !
बीजिंग : चीनच्या ‘चीन इस्लामिक असोसिएशन’ या सरकारी मुसलमान संघटनेने देशातील सर्व मशिदींवर राष्ट्रध्वज फडकावला जावा, अशी मागणी केली आहे. देशभक्तीची भावना वाढवण्यासाठी चीनची घटना आणि समाजवादाच्या मूळ विचारांचाही अभ्यास केला पाहिजे, असेही या संघटनेने म्हटले आहे. या असोसिएशनने त्याच्या संकेतस्थळावर एक पत्र प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये देशभरातील इस्लामी संघटनांनी आणि मशिदीच्या प्रमुख ठिकाणी प्रत्येक वेळी राष्ट्रध्वज फडकावण्याचा आग्रह करण्यात आला आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात