Menu Close

हिंदूंच्या मिरवणुकीत अडथळा आणणारे राजस्थान पोलीस !

‘ब्राह्मण समाजाकडून जयपूर (राजस्थान) येथे २२ एप्रिल २०१८ या दिवशी खानिया मंदिर ते ५२ फूट हनुमान मंदिरापर्यंत भगवान परशुरामाची मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीला रितसर अनुमती काढण्यात आली होती. तरीही काही पोलिसांनी तिला अडवण्याचा प्रयत्न केला. खो-नागोरियन पोलीस ठाण्याचे प्रभारी (तात्पुरता पदभार) इंद्राज मरोडिया यांनी भगवान परशुराम यांच्याविषयी अवमान करणारी विधाने केली आणि लोकांच्या हातातील परशू खेचून घेतले. यामुळे ब्राह्मण समाज आणि पोलीस यांच्यात हाणामारी झाली. त्यानंतर उपस्थित लोकांनी वाद सोडवला, तसेच झालेल्या घटनेविषयी इंद्राज यांनी क्षमा मागितली.’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *