Menu Close

हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी श्री स्वामी समर्थ मठ, उन्हाळे, ता. राजापूर येथे धर्मप्रेमींचे साकडे !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ७६ व्या जन्मोत्सवानिमित्त ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियान’

राजापूर : श्री स्वामी समर्थ मठ, उन्हाळे या मंदिरात अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या हस्तस्पर्शाने पावन झालेल्या स्वामींच्या पादुका स्थापित आहेत. सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांना दीर्घायुष्य लाभावे आणि प्रभावी हिंदूसंघटन होऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेतील सर्व अडथळे दूर व्हावेत, यासाठी १९ मे २०१८ च्या रात्री ८ वाजता येथे धर्मप्रेमींच्या वतीने साकडे घालण्यात आले.

हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष श्री. महेश मयेकर यांनी साकडे घालण्याचा उद्देश सांगितला. या वेळी मंदिराचे पुजारी श्री. दिलीप पेनकरकाका, मंदिराचे अध्यक्ष श्री. नवनीत कुशे, अधिवक्ता  गुरुनाथ शिवलकर, श्री. दिंगबर गोरे, श्री. विलास प्रभुदेसाई, सनातन संस्थेचे श्री. संजय माने, कु. हर्षदा प्रभुदेसाई आणि श्री. अविनाश पाटणकर उपस्थित होते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *