चेन्नई : तमिळनाडूमध्ये हिंदु मंदिर आणि मंदिर व्यवस्थापन यांमध्ये धर्मादाय विभागाकडून होणार्या गैरप्रकाराचा निषेध करण्याच्या दृष्टीने कार्यक्रम आखण्यासाठी शिवसेनेच्या स्थानिक संघटनेची बैठक २० मे या दिवशी परसवक्कम, चेन्नई येथे पार पडली. या बैठकीत हिंदु जनजागृती समितीला स्वभावदोष निर्मूलन सत्संग घेण्यासाठी निमंत्रित करण्यात आले होते. सनातनच्या संत पू. (सौ.) उमा रविचंद्रन् यांनी या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. आंदोलन किंवा अन्य कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी आध्यात्मिक बळ वाढवणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. सौ. सुगंधी जयकुमार यांनी ‘स्वभावदोष निर्मूलना’विषयी मार्गदर्शन केले. स्वभावदोष उफाळून येण्यामागील काही उदाहरणे त्यांनी सांगितली. सौ. कल्पना बालाजी यांनी ‘गुरुपौर्णिमेचे महत्त्व’ विशाद केले आणि सर्वांना गुरुपौर्णिमेच्या सेवेत सहभागी होण्याचे आवाहन केले.
श्री. बालाजी आणि कु. हिम्नीश यांनी छायाचित्र काढण्याची सेवा केली. सौ. सुधा यांनी ग्रंथप्रदर्शन लावण्याची सेवा केली. बैठकीला सुमारे ६० शिवसैनिक आणि हिंदु नेते उपस्थित होते.
क्षणचित्रे
१. शिवसेनेची स्थानिक संघटनेची बैठक असली, तरी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले पक्षाचे नेते श्री. राधाकृष्णन्जी यांनी हिंदु जनजागृती समितीला सत्संग घेण्यासाठी निमंत्रित केले, तसेच भारत हिंदु मुन्नानीचे (भारत हिदु आघाडीचे) श्री. प्रभुजी आणि हिंदु मक्कल मुन्नानीचे श्री. नारायणजी यांनाही निमंत्रित केले होते.
२. या वेळी सनातनने प्रकाशित केलेले तमिळ भाषेतील ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.