Menu Close

अभिनेते सलमान खाननिर्मित ‘लवरात्री’ चित्रपटाला विश्‍व हिंदु परिषदेचा विरोध

  • सलमान खान स्वधर्मातील सणांवरून चित्रपटाला नाव का देत नाहीत ? तसे केल्यास पुढे होणार्‍या परिणामांची त्यांना जाणीव आहे, हे वेगळे सांगायला नको !
  • ‘पीके’ चित्रपटातून हिंदूंच्या देवतांचा अवमान करण्यात आला होता आणि त्याला हिंदूंच्या संघटनांनी विरोध केला, तरी हा चित्रपट देशात प्रदर्शित झाला अन् त्या चित्रपटाने कोट्यवधी रुपये कमावले, तसेच या चित्रपटाविषयी झाल्यास आश्‍चर्य वाटू नये; कारण केंद्रातील भाजप सरकार आणि हिंदू यांच्यात धर्माभिमानाचा अभाव असल्याने त्यांना देवता आणि हिंदु धर्म यांच्या अवमानाचे काहीच वाटत नाही !

नवी देहली : अभिनेते सलमान खाननिर्मित ‘लवरात्री’ या चित्रपटाला विश्‍व हिंदु परिषदेने विरोध केला आहे. चित्रपटाच्या नावामध्ये हिंदु सणाचा उल्लेख असल्याने विहिंपने याला विरोध केला आहे. विहिंपचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष आलोक कुमार म्हणाले की, देशातील कोणत्याच चित्रपटगृहात आम्ही हा चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही. या चित्रपटाच्या नावामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या जाव्यात, असे आम्हाला मुळीच वाटत नाही. ‘नवरात्री’च्या संकल्पनेवर आधारित या चित्रपटातून याचा वेगळाच अर्थ प्रेक्षकांपर्यंत जात आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *