Menu Close

कोडुंगल्लूर (केरळ) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदुत्वनिष्ठांसाठी बैठक

त्रिशूर : केरळ राज्याच्या त्रिशूर जिल्ह्यातील कोडुंगल्लूर येथे  हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदुत्वनिष्ठांसाठी बैठक घेण्यात आली. हिंदुत्वनिष्ठ  श्री. पी.टी. राजू यांनी या बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत विविध संघटनांचे सुमारे ३० हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते. श्री. पी.टी. राजू यांनी या बैठकीत बोलतांना भारत आणि हिंदु यांच्या सध्याच्या दयनीय स्थितीविषयी माहिती दिली. हिंदु जनजागृती समितीच्या कु. रश्मी परमेश्‍वरन् यांनी हिंदु राष्ट्राच्या आवश्यकतेविषयी माहिती दिली. हिंदु धर्मावरील आघात रोखण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा हिंदु राष्ट्राची स्थापना केल्यास हे सर्व प्रश्‍न कायमचे सुटणार आहेत, असे कु. परमेश्‍वरन् यांनी सांगितले.

या वेळी प्रश्‍नोत्तराचे सत्र घेण्यात आले. मुख्य कार्यक्रमानंतर काही क्रियाशील हिंदुत्वनिष्ठांसाठी ‘साधना’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. काहींनी साधनेला प्रारंभही केला आहे. श्री. पी.टी. राजू हे गेल्या चार वर्षांपासून अखिल भारतीय हिंदु अधिवेशनाला उपस्थित रहात आहेत. त्यांनी हिंदुत्वनिष्ठांच्या शंकांचे निरसन केले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *