देहली : तिबेटच्या लोकांवर कसे अत्याचार करण्यात आले आणि त्यांची सध्याची स्थिती यांविषयी सर्व हिंदुत्वनिष्ठांना अवगत करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी देहली येथे बौद्ध धर्मगुरु दलाई लामा ब्युरोचे प्रतिनिधी नोडूप डॉन्गचुंग, तिबेट समन्वय केंद्राचे लोबसांग तेंजिन, सेंट्रल तिबेटिअन एडमिनिस्ट्रेशनचे अध्यक्ष डॉ. लोबसांग सनंगेय यांची भेट घेऊन त्यांना गोवा येथे होणार्या सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाचे निमंत्रण दिले.
६० वर्षांपूर्वी तिबेटच्या मूळ निवासींना त्यांच्याच देशातून बळजोरीने हाकलण्यात आले. आजही ते भारतात शरणार्थींच्या रूपात जीवन जगत आहेत. त्यांना स्वातंत्र्य आणि सन्मानाने त्यांच्या देशात स्थान मिळावे, यासाठी या हिंदु अधिवेशनात एक प्रस्ताव पारित करण्यात येणार आहे.