परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ७६ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने…
बेंगळुरू : परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ७६ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने २० मे २०१८ या दिवशी विजयनगर, बेंगळुरू येथील विजय विवेक प्रतिष्ठानमध्ये माहिती अधिकार कायद्याविषयी कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत माहिती अधिकार कार्यकर्ता तथा अधिवक्ता शशीकुमार, हिंदु विधिज्ञ परिषदेच्या अधिवक्त्या कु. दिव्या बालेहित्तल, हिंदु जनजागृती समितीचे श्री. मोहन गौडा यांनी माहिती अधिकार कायद्याविषयी माहिती दिली. या कायद्याच्या आधारे सामाजिक क्षेत्रात लढा देण्याचे महत्त्व त्यांनी विशद केले. या कार्यशाळेत श्रीराम सेनेचे कार्यकर्ते आणि इतर धर्माभिमानी सहभागी झाले होते.
आज सर्व क्षेत्रात भ्रष्टाचार बोकाळला आहे. सध्याची व्यवस्था त्याला उत्तरदायी आहे. माहिती अधिकार कायद्याच्या आधारे समाजात बदल घडवून आणणे, जागृती निर्माण करणे आणि लोकांना संघटित करून बलशाली राष्ट्राची निर्मिती करणे, यासाठी आपण प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत वक्त्यांनी या वेळी व्यक्त केले. या वेळी उपस्थितांनी माहिती अधिकार कायद्याच्या आधारे भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा देण्याची शपथ घेतली.