हिंदु राष्ट्र-जागृती अभियानांतर्गत मध्यप्रदेशातील इंदूर आणि उज्जैन येथे उपक्रम
इंदूर (मध्यप्रदेश) : सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांचा जन्मोत्सव (७६ वा वाढदिवस) वैशाख कृष्ण पक्ष सप्तमी म्हणजे ७ मे या दिवशी उत्साही आणि भावपूर्ण वातावरणात पार पडला. या जन्मोत्सवाच्या निमित्ताने मध्यप्रदेश येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या दीर्घायुष्यासाठी, तसेच हिंदु राष्ट्र स्थापनेतील अडथळे दूर होण्यासाठी इंदूर येथील आंबेडकर नगरातील एल्आयजी स्क्वेअरजवळील शिवमंदिरात २१ मे या दिवशी भारत स्वाभिमान मंचाच्या वतीने साकडे घालण्यात आले. या वेळी भारत स्वाभिमान मंचाचे सचिव श्री. दीपकजी कोठारी आणि त्यांचे ८ कार्यकर्ते, तसेच हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश समन्वयक श्री. योगेश व्हनमारे आदी धर्मप्रेमी उपस्थित होते. या वेळी साकडे घालण्याचा उद्देश श्री. व्हनमारे यांनी धर्मप्रेमींना सांगितला आणि प्रार्थनाही सांगितली. साकडे घालण्यापूर्वी ‘हिंदु राष्ट्राची स्थापना आणि साधना’ या विषयावर श्री. व्हनमारे यांनी प्रवचन घेतले.
क्षणचित्र : प्रवचनानंतर उपस्थित युवकांनी हिंदु राष्ट्राची स्थापना, मेकॉलेप्रणीत शिक्षणपद्धतीमुळे झालेली हानी आदींविषयी शंकानिरसन करून घेतले.