- मुसलमानबहुल गावातील मशिदीमध्ये कधी होळी, दसरा, दिवाळी किंवा नवरात्र साजरे केले जाते का ?
- अशी गांधीगिरी हिंदू कधीपर्यंत करत रहाणार ?
- मेजवानीला येणार्यांनी कधी जिहादी आतंकवाद्यांचा निषेध केला आहे का ? काश्मीरमध्ये सैन्यावर दगडफेक करणार्यांचा विरोध केला आहे का ? काश्मीरमधून धर्मांधांमुळे विस्थापित झालेल्या हिंदूंविषयी काही म्हटले आहे का ?
- हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकांवर मशिदींतून आक्रमण होते, तेव्हा मुसलमान विरोध करतात का ?
- इस्लामी देशांत हिंदूंच्या सणांच्या वेळी हिंदूंसाठी मेजवानी देण्याची कृती केली जाते का ?
मल्लपुरम् (केरळ) – येथील मुसलमानबहुल कोट्टाकल गावामधील भगवान विष्णूच्या मंदिरात इफ्तारची मेजवानी आयोजित करण्यात आली होती. त्यात ७०० मुसलमान सहभागी झाले होते. त्यांना शाकाहारी बिर्याणी आणि अन्य पदार्थ, फळ, फळांचा रस आदी देण्यात आले. मंदिर व्यवस्थापन समिती प्रतिवर्षी या मंदिरात या मेजवानीचे आयोजन करते. गेल्या वर्षी ५०० मुसलमान यात सहभागी झाले होते.
१. या लक्ष्मी नरसिंह विष्णु मंदिराचा प्रतिष्ठापना दिवस २४ मे या दिवशी साजरा करण्यात आला होता. त्या निमित्ताने ही मेजवानी देण्यात आली होती. यासाठी मंदिर व्यवस्थापन समितीने एका विशेष समितीची स्थापना केली होती.
२. व्यवस्थापन समितीचे सचिव मोहनन नायर यांनी सांगितले की, इफ्तारची मेजवानी शांती आणि समरसता यांचा संदेश देण्यासाठी आयोजित केली होती. यासाठी प्रतिवर्षी गावकर्यांचे साहाय्य घेण्यात येते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात