सोलापूर : सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी ७ मे या दिवशी वयाची ७६ वर्षे पूर्ण केल्यानिमित्त हिंदु राष्ट्र-जागृती अभियानाच्या अंतर्गत २३ मे या दिवशी येथे हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्था, हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि विविध संप्रदाय यांच्या वतीने ‘हिंदू एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले होते. या वेळी चार हुतात्म्यांच्या पुतळ्यांना मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर अखिल भारतीय वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज, शिवसेनेचे नगरसेवक श्री. गुरुशांत धुत्तरगावकर, हिंदू विधीज्ञ परिषदेचे महाराष्ट्र अधिवक्ता संघटक आणि हिंदु जनजागृती समिती पुरस्कृत सुराज्य अभियानाचे समन्वयक अधिवक्ता नीलेश सांगोलकर, सोलापूर बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष आणि सोलापूर रेल्वे बोर्डावर विधी सल्लागार अधिवक्ता लक्ष्मण मारडकर, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री तिवारी यांनी हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात सक्रीयरित्या सहभागी होण्याचे आवाहन उपस्थितांना केले.
..अशी झाली दिंडी
१. हिंदु नववर्ष उत्सव समितीचे अध्यक्ष श्री. रंगनाथजी बंग यांच्या हस्ते धर्मध्वजाचे पूजन करण्यात आले; शिवसेनेचे नगरसेवक श्री. गुरुशांत धुत्तरगावकर यांच्या हस्ते धर्मध्वजाला पुष्पहार अर्पण करण्यात आला. पुरोहित शैलेंद्र जोशी यांनी पौरोहित्य केले.
२. उपमहापौर सौ. शशिकला बत्तुल यांनी पालखीतील श्री तुळजाभवानी देवीच्या प्रतिमेचे पूजन केले. श्रीराम युवा सेना अध्यक्ष राजकुमार पाटील यांनी पालखीतील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राचे पूजन केले.
३. दिंडीच्या अग्रभागी असलेल्या श्री तुळजाभवानी देवी आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पालख्यांचे पाच सुवासिनींच्या हस्ते पूजन करण्यात आले. या वेळी सनातनचे साधक आणि श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील पुजारी श्री. अमित कदम यांनी शंखनाद केला.
४. सर्वश्री माजी नगरसेवक जगदीश पाटील, अखिल भारतीय हिंदु महासभेचे शहराध्यक्ष सुधीर बहिरवाडे, पंढरपूर शहर बजरंग दलाचे शहराध्यक्ष सुनील बाबर, सामाजिक समरसता प्रखंड प्रमुख रवींद्र साळेसर, श्रीराम युवा सेनेचे अध्यक्ष राजकुमार पाटील, गुरुशांत धुत्तरगावकर यांनी दिंडीसमोर नारळ वाढवला.
५. दिंडीच्या प्रारंभी शौर्यजागरण करणारी ओकीनावा मार्शल आर्ट, शिवस्मारक शाखेच्या विद्यार्थ्यांनी लाठी-काठी, दंडसाखळी यांची चित्तथरारक प्रात्यक्षिके, तर समितीच्या कार्यकर्त्यांनी स्वरक्षण प्रशिक्षणाची प्रात्यक्षिके केली.
६. एका चारचाकीवर परात्पर गुरु डॉ. आठवले यांची मेघडंबरीमध्ये ठेवलेली प्रतिमा दिंडीच्या प्रारंभीच होती.
७. रस्त्यावरून येणारे-जाणारे पालखीतील परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या प्रतिमेला भावपूर्ण नमस्कार करत होते. हिंदु राष्ट्राचे प्रथम उद्गाते परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आशीर्वादाने ‘हिंदु राष्ट्र’ येणारच आहे, याची जणू ती साक्ष होती.
मान्यवरांची भाषणे
हिंदूंमधील शक्तीची जाणीव होण्यासाठी दिंडीचे आयोजन करायला हवे ! – गुरुशांत धुत्तरगावकर, नगरसेवक, शिवसेना
‘हिंदू जाती आणि पोटजाती यांच्यात विखुरले जात आहेत. एकीच्या बळाचे महत्त्व आपण लहानपणापासून शिकलो आहोत. हिंदूंमध्ये प्रचंड शक्ती आहे, याची जाणीव करून देण्यासाठी गावोगावी अशा दिंडींचे आयोजन व्हावे.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दीर्घायुष्य लाभो ! – ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज
धर्माभिमानासाठी गुरूंविषयी दृढ श्रद्धा आणि निष्ठा असणे आवश्यक असते. ती वाढण्यासाठी आम्ही दिंडीमध्ये सहभागी झालो आहोत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभावे, अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना !
परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी दिलेली प्रेरणा घेऊन हिंदु राष्ट्र निर्मितीच्या कार्यात सहभागी व्हावे ! – अधिवक्ता लक्ष्मण मारडकर
हिंदुस्थानातच पोलिसांकडून हिंदु धर्माच्या कार्यक्रमांना वेळ अल्प दिला जातो, यासारखे दुसरे दुर्दैव नाही. भगवद्गीतेत सांगितले आहे, ‘तू करता वही है जो तू चाहता है, पर होता वही है जो मै चाहता हूँ । तू कर वही जो मै चाहता हूँ, फिर होगा वही जो तू चाहता है ।’, अशा पद्धतीने परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी प्रेरणा दिली आहे. ती घेऊन आपण सर्वांनी हिंदु राष्ट्र निर्मितीच्या कार्यात सहभागी व्हावे. या वेळी अधिवक्ता नीलेश सांगोलकर आणि सौ. राजश्री तिवारी यांनीही मार्गदर्शन केले.
उपस्थित मान्यवर
भाजपचे माजी नगरसेवक जगदीश पाटील, पेशवा युवा मंचचे गणेश लंके, श्री पंचमुखी हनुमान देवस्थानचे सत्यनारायण गुर्रम, शिवबा संस्थेचे निरंजन बोद्दुल, नागेश सरगम, परशुराम युवा मंचचे अध्यक्ष आेंकार कुलकर्णी, श्रीराम बडवे, मयुर बडवे, विश्व हिंदु परिषदेचे सामाजिक समरसता प्रांत प्रमुख रवींद्र साळेसर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तालुका सेवाप्रमुख रामेश्वर कोरे, सामाजिक कार्यकर्ते अनिल सप्ताळ, शिवसेनेचे महेश (भैय्या) धाराशिवकर, धनराज जानकर, विश्वेश्वर गड्डम, श्रीनिवास माने, गोशाळेचे अभय कुलथे, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे रवि गोणे, चिदंबर कारकल, सारस्वत ब्राह्मण समाजाच्या सौ. निर्मला ओझा, योग वेदांत सेवा समितीचे योगेश हरसुरे, पद्मशाली पुरोहित संघ आणि भृगकुल पद्वशाली संघाचे पुरोहित, बापू ढगे, सतीश पुला, धर्मप्रेमी बसवराज जमखंडी, तसेच इस्कॉनचे कार्यकर्ते आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी
यांनी केले धर्मध्वज पूजन, पालखी पूजन आणि पुष्पवृष्टी
सर्वश्री अंबिका ट्रेडींग आस्थापनाचे आणि सिंधी समाजाचे श्याम वाधवानी, गोपालक गोपाल सोमाणी, ‘व्ही.आर्. पवारचे राजेश पवार, झाड ज्वेलर्सचे प्रेमकुमार झाड, दैनिक सनातन प्रभातचे वाचक भीमाशंकर लिंगशेट्टी, लक्ष्मण टेलर्सचे अशोक चौधरी, श्रीनिवास वैद्य, ‘सत्यम ऑप्टेशिएअन्स’चे सत्यम गुंटूक, हितचिंतक सुनील क्षीरसागर, नागेश कटारे, अमरनाथ बिराजदार, संजय डेअरीचे गुरुपादैया हिरेमठ, ऑल इंडिया मेडिकलचे संतोष स्वामी, श्री एंटरप्रयजेसचे श्रीकांत सरवदे, हिंदुस्थान होजिअरीचे नरेश हिंदुजा, डॉ. अनिल दामले.
दैवी बालसाधकांचे वैशिष्ट्यपूर्ण अनुभव
१. माझा मुलगा आणि ६० टक्के आध्यात्मिक पातळीचा चि. श्रीहान आटपाडकर (वय २ वर्षे) याला मी सांगितले की, ‘पाऊस येत आहे, तू बाप्पाला प्रार्थना कर. बाप्पाच्या दिंडीत अडथळे यायला नको.’ त्याने पावसाला सांगितले, ‘‘अरे, पावसा तुला कळत नाही का ? थांब ना जरा ! माझ्या बाप्पाची दिंडी चालू आहे. ही दिंडी व्यवस्थित व्हायला हवी.’’ त्यानंतर काही क्षणांत पावसाचे प्रमाण अल्प झाले. – सौ. शुभांगी आटपाडकर
२. ६३ टक्के अध्यात्मिक पातळीची चि. श्रेयसी सांगोलकर (वय ४ वर्षे) हिने मला सांगितले, ‘‘बाबा, रणरागिणी झाशीची राणी मला प्रत्यक्ष दिसली. त्या वेळी माझ्या अंगावर रोमांच आले आणि खरे खरे प.पू. डॉक्टर चष्मा घातलेले व्यासपिठाच्या मागे आणि दिंडीमध्ये दिसत होते.’’ – अधिवक्ता नीलेश सांगोलकर, पंढरपूर
क्षणचित्रे
१. एका लहान मुलीने कुटुंबियांना दिंडीत सहभागी होण्याचा हट्ट केला. तिच्यासह कुटुंबातील दोघे दिंडीत सहभागी झाले.
२. वृद्ध आजोबा आणि समाजातील लोक वाहन थांबवून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पालखीतील प्रतिमेचे दर्शन घेत होते.
३. समितीच्या एका कार्यकर्त्याला पोलीस म्हणाले, ‘‘तुमची दिंडी एवढी मोठी होईल, असे वाटले नव्हते !’’
४. रणरागिणी पथकातील युवती गोमातेविषयी घोषणा देत असतांना १ गोमाता तेथे आली. तिने सर्वांना आशीर्वाद दिल्याचे जाणवले.
५. वरुणदेवानेही उपस्थिती दर्शवून सर्वांना आशीर्वाद दिला.
फेसबूकच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण !
दिंडीचे फेसबूकच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले होते. २४ सहस्र ५३२ लोकांपर्यंत दिंडीचा विषय पोहोचला. ६ सहस्र २०० जणांनी दिंडी ‘लाईव्ह’ पाहिली.