Menu Close

आग्रा येथे हिंदु धर्मजागृती सभा

एकाच देशात दोन राज्यघटना असणारा जगातील एकमेव देश भारत ! – सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

व्यासपिठावर डावीकडून श्री. कार्तिक साळुंके, श्री. अमित चौधरी, सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे आणि सौ. मोनिका सिंह

आग्रा : राजकारणी ‘धर्मनिरपेक्षता’ हा चुकीचा शब्द वापरून हिंदूची दिशाभूल करत आहेत. राज्यघटनेत ‘सेक्युलर’ या शब्दाचे भाषांतर ‘पंथ निरपेक्ष’ असे आहे. जम्मू-काश्मीर इस्लामिक राज्य आहे आणि भारत ‘पंथ निरपेक्ष’ ! एकाच देशात दोन राज्यघटना असणारा भारत जगातील एकमेव देश आहे. संसदेत आज केवळ ‘स्वत:ची वेतनवृद्धी’ या एकाच गोष्टीवर एकमत होते. समाजाच्या समस्यांवर सर्व नेत्यांचे एकमत झाले, असे एकही उदाहरण मिळत नाही. ही स्थिती पालटण्यासाठी सर्वांनी संघटित स्वरूपात हिंदु राष्ट्राच्या दिशेने पाऊल उचलणे आवश्यक आहे. आज हिंदु राष्ट्रासाठी आम्हाला बाहुबल, मनोबल यांच्या समवेत आध्यात्मिक बळ वाढवणे सर्वांत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नुकतीच आग्रा येथे हिंदु धर्मजागृती सभा पार पडली. या सभेत सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांनी मार्गदर्शन केले.

हिंदूंचे रक्षण करणे आवश्यक ! – अमित चौधरी, प्रदेशाध्यक्ष, हिंदु जागरण मंच

आज हिंदू मार खात आहेत. अलीगड, कैराना, आग्रा यांसारख्या भागातील हिंदू स्वत:ला असुरक्षित समजत आहेत. त्यांना स्वतःच्या भूमीतून पलायन करावे लागत आहे. त्यामुळे हिंदूंचे रक्षण होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

धर्मांधांकडून १४ प्रकारचे जिहाद ! – कार्तिक साळुंके, हिंदु जनजागृती समिती

आता ‘जिहाद’ केवळ बॉम्बस्फोट, हत्या येथपर्यंतच मर्यादित राहिलेला नाही, तर देशात लव्ह जिहाद, लॅण्ड जिहाद, फतवा जिहाद, फिल्म जिहाद, सेक्स जिहाद यांसारखे १४ प्रकारचे जिहाद चालू आहेत.

साधनेमुळे हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हिंदूंना आध्यात्मिक बळ मिळेल ! – सौ. मोनिका सिंह, सनातन संस्था

धर्माचरण आणि साधना यांमुळे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे चारित्र्य निर्माण होते. धर्माचरण आणि साधना यांच्या बळावर महाराजांनी राजधर्माचे पालन करत प्रजेचे रक्षण केले होते. साधनेमुळे सर्व हिंदूंना हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आध्यात्मिक बळ मिळेल. त्यामुळे प्रत्येक हिंदूने देवतांचे नामस्मरण करणे आवश्यक आहे.

क्षणचित्रे

१. ५०० हून अधिक धर्मांतरित हिंदूंना हिंदु धर्मात पुन्हा आणणारे बजरंग दलाचे आग्रा संयोजक श्री. बंटी ठाकूर यांचा धर्मासाठी उल्लेखनीय कार्य केल्याविषयी सभेत सत्कार करण्यात आला.

२. सभा होऊ नये, यासाठी काही हिंदुद्वेष्ट्यांनी सामाजिक संकेतस्थळाच्या माध्यमातून समितीच्या विरोधात अपप्रचार करण्याचा प्रयत्न केला; परंतु समितीचे कार्य जाणणार्‍या जागृत धर्मप्रेमींनी त्याला प्रत्युत्तर देऊन या अपप्रचाराचा विरोध केला.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *