Menu Close

उत्तरप्रदेशचे भाजप सरकार ‘अलाहाबाद’चे नाव पालटून ‘प्रयागराज’ ठेवणार

  • उत्तरप्रदेशातील भाजप सरकारचा अभिनंदनीय निर्णय !
  • अशा प्रकारे राज्यातील अलीगड, मुझफ्फरनगर यांच्यासह भाजपशासित अन्य २० राज्यांतील आणि केंद्र सरकार यांच्या अखत्यारितील सर्वत्रची परकीय नावे पालटावीत !

प्रयाग : उत्तरप्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांचे सरकार लवकरच ‘अलाहाबाद’चे नाव पालटून त्याचे जुने नाव ‘प्रयागराज’ ठेवणार आहे. वर्ष २०१९ च्या कुंभमेळ्याच्या पूर्वी ही प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे या काळात सरकारकडून सर्वत्र ‘प्रयागराज’ असा उल्लेख करण्यात येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी सांगितले की, प्राचीन काळापासून याला ‘प्रयाग’ म्हणून ओळखले जाते. त्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *