Menu Close

म्यानमारमधील हिंदूंच्या हत्याकांडाची चौकशी करून उत्तरदायींना शिक्षा करा : अमेरिका

अमेरिका असे म्हणते; मात्र भारतातील भाजप सरकार आणि सर्वत्रच्या हिंदुत्वनिष्ठ संघटना असे अजूनही म्हणत नाहीत, हे लज्जास्पद !

वॉशिंग्टन : म्यानमारमध्ये रोहिंग्या मुसलमानांच्या ‘अराकान रोहिंग्या सॉल्वेशन आर्मी (एआर्एस्ए)’कडून ९९ हिंदूंची हत्या झाल्याचे ‘अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनल’ या संस्थेने सांगितले. या घटनेवर अमेरिकेने चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते म्हणाले की, म्यानमारच्या अशांत राखिन प्रांतामध्ये झालेल्या मानवाधिकाराच्या उल्लंघनाच्या या प्रकरणाचे तात्काळ निष्पक्ष अन्वेषण करायला हवे. अशा प्रकारच्या अहवालाचे अमेरिका नेहमीच समर्थन करत राहील. या घटनेविषयी चौकशीद्वारे सर्व तथ्ये पडताळून पाहून त्याला उत्तरदायी असणार्‍यांना दोषींना शिक्षा व्हावी आणि पीडितांना न्याय मिळावा.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *