नांदेड : येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २७ मे या दिवशी आयोजित केलेल्या हिंदु धर्मजागृती सभेची पूर्वसिद्धता अंतिम टप्प्यात आली आहे. अनेक गावांतील युवक ढोल-ताशांच्या गजरात सभेला उपस्थित रहाणार आहेत. शहर आणि आसपासच्या गावांतील हिंदूंना सभेचा विषय निमंत्रण पत्रिका, फेसबूक, व्हॉट्सअॅप या माध्यमांतून, तसेच गावातील तरुण, व्यापारी, अधिवक्ते यांच्या बैठका घेऊन, तसेच रिक्शांवर फलक लावणे, फलकप्रसिद्धी यांद्वारे पोहोचवण्यात आला आहे. नांदेडवासियांनी सभा यशस्वी करण्याचा निर्धार केला आहे.
प्रसारानिमित्त श्री शिवलिंग बादशाह मठ संस्थान, बेटमोगराचे गादीपती सद्गुुरु सिद्धदयाळ शिवाचार्य महाराज, ष.ब्र.१०८ डॉ. वीरुपाक्ष शिवाचार्य महाराज, नांदेड मेडिकल असोसिएशन संघटनेचे अध्यक्ष श्री. शंतनु कोडगिरे, प्रजापिता ब्रह्मकुमारी, विश्व हिंदु परिषदेचे कार्यकर्ते यांना, तसेच मुखेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष श्री. बाबूराव देबडवार यांच्याही भेटी घेऊन सभेचे निमंत्रण देण्यात आले.