- भारतात आणि इस्लामी देशातच नव्हे, तर ख्रिस्तीबहुल देशातही धर्मांध हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणे करतात !
- भारतात एखाद्या मशिदीवर दगड भिरकावल्याची किंवा होळीच्या वेळी रंग उडवल्याची अफवा जरी पसरली, तरी धर्मांध रस्त्यावर येतात !
हेग (नेदरलॅण्ड) : नेदरलॅण्डची राजधानी हेग येथील एका हिंदु मंदिराची २२ मेच्या रात्री तोडफोड करण्यात आली. मंदिराच्या व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षाने प्रादेशिक वृत्तवाहिनीस सांगितले की, हा प्रकार जाणूनबुजून केलेला होता. हे हिंदु मंदिर हेगच्या कुख्यात मुसलमानबहुल ‘स्किल्डर्सविज’ या परिसरात आहे. हा परिसर जिहादी आणि इस्लामिक स्टेट यांच्या समर्थकांच्या झुंडशाहीसाठी ओळखला जातो.
१. मंदिराच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सिद्धार्थ रामधनी म्हणाले, ‘‘मंदिराची हानी झाली आहे. अनेक मोठ्या दगडांनी खिडक्या फोडून टाकल्या. हे दगड मंदिराला अगदी लागून असलेल्या मैदानांवरून फेकले गेले. त्यासाठीही जोरदार प्रयत्न करावे लागले असावेत; कारण मंदिराच्या दोन्ही खिडक्या दुहेरी काचेने बनल्या आहेत.’’
२. श्री. रामधनी यांच्या मते मंदिराला हेतूपुरस्सर लक्ष्य केले गेले होते; कारण पूर्वी सुद्धा रमझानच्या वेळी असाच प्रयत्न केला होता. फक्त रमझानच्या काळातच नव्हे, तर हिंदूंच्या धार्मिक उत्सवाच्या वेळीही धर्मांध तरुण आम्हाला त्रास देत आहेत.
३. वर्ष २०१४ मध्ये इस्लामिक स्टेटच्या समर्थंकांनी येथे इस्रायलविरोधी निदर्शने केली होती. नंतर अनेक कट्टरतावाद्यांना अटक करून डच न्यायालयाने गुन्हेगारी संघटनेचे सदस्य म्हणून शिक्षा सुनावल्या होत्या.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात