चीनची भारताच्या धार्मिक क्षेत्रातही घुसखोरी ! उद्या देशातील प्रत्येक धार्मिक उत्सवात चीन अशा प्रकारे पैसा ओतून हिंदूंमध्ये चीनविषयी सहानुभूती निर्माण करील आणि चीनला होणार्या विरोधाची धार बोथट करण्याचा प्रयत्न करील ! ही स्थिती येण्यापूर्वीच हिंदूंनी सतर्क व्हावे !
कोलकाता – बंगालमधील दुर्गापूजांना चीन प्रायोजित करणार आहे. सांस्कृतिक आणि व्यावसायिक संबंध अधिक दृढ करण्याच्या नावाखाली चीनकडून हा प्रयत्न केला जाणार आहे. कोलकात्यातील बीजे ब्लॉक या भागातील दुर्गापूजा चीनच्या वाणिज्य दूतावासाकडून यापूर्वीपासून प्रायोजित करण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांत चीनने कोलकाता पोलिसांसह दुर्गापूजांच्या वेळी पारितोषिकांची घोषणा केली होती. आता चीन आणखी दुर्गापूजा प्रायोजित करण्याचा प्रयत्न करणार आहे.
१. यावर्षी बीजे ब्लॉक येथील दुर्गापूजेमधील काही कलाकारांना चीनची ‘आर्किटेक्चर डिझाईन’ कला शिकण्यासाठी चीनमध्ये पाठवण्यात येणार आहे. याद्वारे दुर्गापूजेच्या मंडपामध्ये चीनच्या कलेचाही समावेश व्हावा आणि हे मंडप बौद्धांच्या पॅगोडाप्रमाणे दिसावेत, असा प्रयत्न असणार आहे. (पुढे ही पूजा हिंदूंची आहे कि बौद्ध धर्मीय चिनी लोकांची, असा प्रश्न पडल्यास आश्चर्य वाटू नये ! – संपादक)
२. चीन प्रायोजित करणार असलेल्या दुर्गापूजांमध्ये येणार्या भाविकांना चायनीज बासुरी, ड्रॅगन नृत्य आणि एक्रोबेटिक्स पहायला मिळणार आहे. यासाठी चीनमधून कलाकारांना बोलावण्यात येणार आहे.
३. चीनच्या दूतावासाचे जनरल मा झानवू म्हणाले की, कोलकातामधील दुर्गापूजा सर्वांना एकत्र आणण्याचा मार्ग आहे. आम्ही आमच्या दूतावासामध्येही अनेक धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करत असतो. यावर्षी कोलकात्याच्या सॉल्ट लेक मधील दुर्गापूजा चीनमय करणार आहोत. गेल्या वर्षी आम्ही दुर्गापूजा आयोजित करणार्यांना पारितोषिकेही दिली आहेत, तर अनेकांना प्रशिक्षणासाठी चीनमध्येही पाठवले होते.
४. बीजे ब्लॉक येथील दुर्गापूजा आयोजनाचे सचिव उमाशंकर घोष दास्तिदार यांनी सांगितले की, पुढील काही आठवड्यांत दूतावासासमवेत नियोजनासंदर्भात बैठक घेऊन पुढील योजना बनवणार आहोत. गेल्या वर्षीच्या ४० लाख रुपयांच्या तुलनेत यावर्षी अधिक खर्च येण्याची शक्यता आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात