‘देशातील धर्मनिरपेक्षता धोक्यात असल्याने ख्रिस्त्यांनी प्रार्थना करावी’, असे पत्र लिहिल्याचे प्रकरण
संपूर्ण देशात केवळ अधिवक्ता देवदास शिंदे यांनाच ही कृती करावी वाटली, हे अन्य हिंदूंना लज्जास्पद !
मुंबई : वर्ष २०१९ मध्ये होणार्या निवडणुकांच्या निमित्ताने ख्रिस्त्यांना प्रार्थना करण्यास सांगणारे पत्र लिहिणारे देहलीचे आर्चबिशप अनिल काउटो यांना पुणे जिल्ह्यातील थेरगाव येथील अधिवक्ता देवदास शिंदे यांनी मुंबई येथील ‘लॉ ग्लोबल’ या आस्थापनाच्या माध्यमातून ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.
१. अधिवक्ता देवदास राजाराम शिंदे यांनी वरील नोटिसीत म्हटले आहे की, ‘या पत्रात असे अपरोक्षपणे म्हटले आहे की, सध्याचे (नरेंद्र मोदी सरकार) सरकार संविधानातील लोकशाही तत्त्व आणि धर्मनिरपेक्षता यांना धोका निर्माण करत आहे अन् वर्ष २०१९च्या निवडणुकीत त्यांना निवडून देऊ नये.
२. आपण (आर्चबिशप अनिल काउटो) असे कुठल्या आधारावर म्हणू शकता ? सध्याचे सरकार गेली ४ वर्षे सत्तेवर आहे. या दरम्यान तुमच्या म्हणण्याला पुष्टी देणारा एकही प्रसंग घडला नाही. त्यामुळे तुमचे विधान चुकीचे, गैरसमज पसरवणारे आणि खोडसाळ आहे. त्याचा हेतू सरकारवर दबाव आणण्याचा असून ते वाईट हेतूने केलेले आहे.
३. तुम्ही एका धार्मिक समुदायाचे प्रतिनिधित्व करत असून तुमचे कर्तव्य केवळ धार्मिक गोष्टींपुरतेच सीमित आहे. एखाद्या राजकीय पक्षाने भडकवल्यानंतर असे वक्तव्य करून देशातील जनतेत धर्माच्या आधारावर फूट पाडण्याचा तुमचा प्रयत्न आहे.
४. त्यामुळे ही नोटीस प्राप्त झाल्यापासून ८ दिवसांच्या आत हे पत्र मागे घ्यावे आणि असे पत्र लिहिल्यासाठी क्षमा मागावी. अन्यथा आपल्याविरुद्ध प्रचलित कायद्यानुसार दिवाणी आणि फौजदारी कारवाई करण्यात येईल.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात