नाशिक : सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांना ७ मे या दिवशी वयाची ७६ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त राबवण्यात येणार्या हिंदु राष्ट्र-जागृती अभियानांतर्गत येथे २६ मे या दिवशी भव्य हिंदू एकता दिंडी काढण्यात आली. या वेळी ३०० हून अधिकांनी सहभाग घेतला. श्रीमती वैशाली कातकडे आणि श्री. प्रशांत कुलकर्णी यांनी उपस्थितांना संबोधित केले. दिंडीला सनातन संस्थेचे पू. महेंद्र क्षत्रिय आणि ह.भ.प. धोंगडे महाराज यांचीही उपस्थिती लाभली.
भावपूर्ण वातावरणात पार पडली दिंडी !
१. नाशिकच्या सुप्रसिद्ध श्री साक्षी गणेश मंदिर परिसरात दिंडीच्या सिद्धतेला प्रारंभ झाला. सनातन संस्थेचे पू. महेंद्र क्षत्रिय यांचे दिंडीस्थळी आगमन झाल्यावर वातावरणात चैतन्य पसरले.
२. धर्मध्वजपूजन आणि परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या पालखीचे पूजन झाल्यानंतर दिंडीला प्रारंभ झाला.
३. रणरागिणी शाखेच्या कार्यकर्त्यांनी केलेली स्वरक्षणाची प्रात्यक्षिके रस्त्यावरील लोकही जिज्ञासेने पहात होते. चौकाचौकात ही प्रात्यक्षिके करण्यात आली.
सहभागी संघटना
बजरंग दल, आसारामबापू संप्रदाय, सनातन संस्था, तसेच हिंदु जनजागृती समिती
उपस्थित मान्यवर
पुरोहित संघाचे श्री. सतीश शुक्ल, बजरंग दलाचे नाशिक जिल्हा संयोजक श्री. विनोद थोरात, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शशिधर जोशी, सनातन संस्थेच्या सौ. ज्योती पंडित
क्षणचित्रे
१. अनेक लोक दिंडीची छायाचित्रे काढत होते.
२. एका पोलीस अधिकार्याने महिलेला सांगितले, ‘‘तुम्ही दुसर्या मार्गाने जा. दिंडी जाण्यास वेळ लागेल.’’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘काहीच अडचण नाही. तोपर्यंत आम्ही दिंडी बघतो.’’
३. धुमाळ चौक येथे परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली.
४. दिंडीची सांगता होत असतांना तिथे आलेल्या विदेशी नागरिकांनी दिंडीविषयी जाणून घेतले.
५. धुमाळ चौकात सनातन प्रभातचे वाचक श्री. सराफ यांनी पालखीतील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राला पुष्पहार अर्पण केला.
६. वाहतूक कर्मचार्यांनी फेरी चांगली झाल्याचे सांगून आनंद व्यक्त केला.
७. दिंडी जात असतांना वाहतूक नियंत्रण करण्यासाठी इतर नागरिकांनीही साहाय्य केले.
८. नागरिक घराच्या बाहेर येऊन, तसेच काही जण दुचाकी-चारचाकी थांबवून दिंडी पहात होते.