बंगालमधील हिंदूंची दयनीय स्थिती न दिसणारे अमर्त्य सेन यांचे मुसलमानधार्जिणे विधान
कोलकाता : ममता बॅनर्जी यांच्या बंगालमधील मुसलमानांची स्थिती दयनीय आहे, असे मुसलमानधार्जिणे विधान अर्थतज्ञ अमर्त्य सेन यांनी येथे केले. अमर्त्य सेन यांनी स्थापन केलेले प्रातिची ट्रस्ट, तसेच गाईडेंस गिल्ड आणि असोसिएशन स्नॅप या संस्थांनी संयुक्तरित्या लिव्हिंग रियालिटीज् ऑफ मुस्लिम इन वेस्ट बंगाल हा अहवाल सिद्ध केला असून त्यात मुसलमानांची कथित दयनीय स्थिती मांडली आहे.
या अहवालात पुढे म्हटले आहे,
१. बंगालमधील ८० टक्के मुसलमान कुटुंबे प्रतिमाह केवळ ५ सहस्र रुपये वेतनावर त्यांचे जीवन व्यतीत करत आहेत. ही लोकसंख्या दारिद्य्ररेषेखाली आहे.
२. यातील जवळजवळ ३८ टक्के मुसलमानांचे मासिक वेतन केवळ २ सहस्र ५०० रुपये एवढेच असून यात ५ जणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करावा लागतो. ३२५ ग्रामीण भागातील गावे आणि ७३ शहरांतील मुसलमानांच्या संख्येवरून हा अभ्यास केला आहे.
३. बंगालमधील केवळ १.५ टक्के मुसलमानांकडे नियमित वेतन मिळणारी खाजगी नोकरी, तर १ टक्के मुसलमानांकडे नियमित वेतन असलेली शासकीय नोकरी आहे.
४. बंगालमधील ग्रामीण भागात ८० टक्के मुसलमान दारिद्य्ररेषेखाली आहेत. संपूर्ण राज्यात १२.५ टक्के मुसलमानांच्या घरात पाण्याची सुविधा पुरवली जात आहे.
५. राज्यातील शहरीकरणाचा स्तर ३२ टक्के असून मुसलमानांच्या शहरीकरणाचा स्तर १९ टक्के इतका आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात