परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ७६ व्या जन्मोत्सवानिमित्त ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियान’
रत्नागिरी : सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या ७६ व्या जन्मोत्सवानिमित्त त्यांना दिर्घायुष्य लाभावे आणि हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी, यासाठी जिल्ह्यात रत्नागिरी, पावस, मेर्वी आणि खेड येथे धर्मप्रेमींच्या वतीने साकडे घालण्यात आले.
रत्नागिरी
येथील श्री देव कालभैरव मंदिरामध्ये २६ मे २०१८ या दिवशी श्री कालभैरवाला साकडे घालण्यात आले. या वेळी मंदिराचे गुरव ओमेय गुरव, पुरोहित सर्वश्री प्रशांत तेरेदेसाई, भाऊ रहाळकर, सुयोग तेरेदेसाई, गजानन काळे, हरिहर गोडबोले हे सर्वजण शनिप्रदोष असल्याने लघुरुद्रासाठी मंदिरात जमले होते. याच वेळी त्यांनी साकडे घातले.
पावस
येथील श्रीराम मंदिरात २६ मे २०१८ या दिवशी श्रीरामाला साकडे घालण्यात आले. या वेळी सर्वश्री श्रीकांत (आबा) चिपळुणकर पावस, प्रकाश गुळेकर, कमलेश गुळेकर, अनंत नाडणकर, संतोष गुळेकर आणि मावळंगे येथील अन्य धर्मप्रेमी उपस्थित होते.
मेर्वी
येथील श्री नवलाईदेवी मंदिरामध्ये २६ मे २०१८ या दिवशी धर्मप्रेमींच्या वतीने श्री नवलाईदेवीला साकडे घालण्यात आले. या वेळी सर्वश्री सखाराम गुरव, श्रीकांत अभ्यंकर, संजय मेस्त्री, डॉ. पिलणकर, नितीन अभ्यंकर, आेंकार अभ्यंकर, सौ. माधुरी अभ्यंकर, सौ. मेस्त्री आणि मेर्वी येथील अन्य धर्मप्रेमी उपस्थित होते.
खेड
१. येथील श्री स्वामी समर्थ मठ, शिवाजी नगर येथे २४ मे २०१८ या दिवशी साकडे घालण्यात आले. या वेळी पुजारी श्री. चव्हाण, हिंदु जनजागृती समितीच्या सौ. स्नेहल तोडकरी, सनातन संस्थेचे श्री. आणि सौ. सकपाळ, श्री. संदीप तोडकरी, धर्माभिमानी सुहल भोसले, स्वप्निल पाटणे, बेंडखळे, जड्याळ, मुद्राळे, सौ. माजलेकर आणि २५ भाविक उपस्थित होते.
२. श्री काळकाईदेवी मंदिर, भरणे येथे २२ मे २०१८ या दिवशी धर्मप्रेमींच्या वतीने श्री काळकाईदेवीला साकडे घालण्यात आले. या वेळी हिंदु जनजागृती समितीच्या सौ. स्नेहल तोडकरी, सनातन संस्थेचे श्री. संदीप तोडकरी, साधना शिंदे, वाचक अनंत कोठारे, मपारा, पुजारी अनंत जंगम आणि २५ भाविक उपस्थित होते.