Menu Close

बिलिव्हर्समुळे धर्मांतरित झालेल्या पेडणे येथील युवकाने तुळशीवृंदावन तोडून तेथे क्रॉस लावण्याचे प्रकरण

पोलीस अधिकार्‍याचा तक्रारदार महिलेला अनाहुत सल्ला : युवक आमचे ऐकत नाही, अघटित घडल्यास १०० क्रमांकावर संपर्क साधा !

पोलीस अन्य गुन्हेगारांची मानसिक स्थिती ठीक करतात, तशी बिलिव्हर्सवाल्यांची का करत नाहीत ? अघटित घडल्यानंतर संपर्क करायला सांगणारे नव्हे, तर अघटित घडूच नये यासाठी उपाययोजना करणारे पोलीस हवेत !

पेडणे : बिलिव्हर्सच्या प्रभावामुळे धर्मांतरित झालेल्या मुरमुसे, पेडणे येथील राजेश कलशावकर यांनी त्यांच्या वडिलोपार्जित घराबाहेरील तुळशीवृंदावन तोडून तेथे बळजोरीने क्रॉस लावण्याची धमकी त्याच घरात रहाणारे त्यांचे बंधू श्री. विराज कलशावकर यांना दिली आहे. या प्रकरणी श्री. विराज कलशावकर आणि त्यांची पत्नी सौ. वैभवी कलशावकर यांनी राजेश कलशावकर याच्या विरोधात पोलिसात तक्रार नोंदवली होती. यानंतर पोलिसांनी ३० मे या दिवशी दोन्ही पक्षांना पोलीस ठाण्यात बोलावले होते. त्यांच्याशी बोलल्यानंतर पोलीस अधिकार्‍याने तक्रारदार सौ. वैभवी विराज कलशावकर यांना सांगितले की, संशयित राजेश कलशावकर आमचे ऐकण्याच्या स्थितीत नाही. त्याची मानसिक स्थिती ठीक नाही, असे वाटते. घरी यापुढे काही अघटित घडल्यास १०० क्रमांकावर तक्रार करा. (पोलिसांनाही न जुमानणारे बिलिव्हर्सवाले हे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था यांसाठी धोकादायकच नाहीत का ? राज्यातील शांती बिघडू नये यासाठी तरी पोलिसांनी कारवाई करायला हवी होती ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संशयित राजेश कलशावकर हा पोलीस कर्मचारी आहे आणि तो पोलीस खात्यातील एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याचे वाहन चालवतो. प्रारंभी संशयित राजेश कलशावकर पोलीस ठाण्यात आल्यावर पोलीस अधिकार्‍यासमोर मोठमोठ्याने बोलू लागला. मुरमुसे, पेडणे येथील वडिलोपार्जित घरासमोरील तुळशीवृंदावन तोडून तेथे बळजोरीने क्रॉस लावणार असल्याचा पुनरुच्चार त्याने या वेळी केला. पोलीस अधिकार्‍याने संशयित राजेश कलशावकर याला समजावण्याचा प्रयत्न केला असता, तो ऐकत नव्हता. यानंतर शेवटी पोलीस अधिकार्‍याने तक्रारदार सौ. वैभवी कलशावकर यांना वरीलप्रमाणे सल्ला दिला. (असे हतबल पोलीस नागरिकांचे रक्षण करू शकत नाहीत. त्यामुळे हिंदुत्वनिष्ठांनाच आता पुढाकार घेऊन समस्या सोडवण्यावाचून पर्याय नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *