Menu Close

सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन : देहली, वाराणसी आणि मंगळुरू येथे पत्रकार परिषद

देहली, वाराणसी आणि मंगळुरू येथे पत्रकार परिषद

हिंदु राष्ट्राची स्थापना या एका ध्येयाने प्रेरित झालेल्या विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे ‘हिंदू अधिवेशन’ प्रतिवर्षी गोवा येथे आयोजित केले जात आहे. यंदा या अधिवेशनाचे ७ वे वर्ष असून २ ते १२ जून २०१८ या कालावधीत ‘सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन’ होणार आहे. प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही हिंदु संघटनांच्या प्रतिनिधींचा वाढता प्रतिसाद लाभत आहे. या अधिवेशनाला भारतातील १९ राज्यांसहित नेपाळ, बांगलादेश आणि श्रीलंका येथून १५० हून अधिक हिंदु संघटनांचे ६५० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित रहाणार आहेत. आतापर्यंत झालेल्या अधिवेशनांच्या परिणामस्वरूप देशभरातील हिंदुत्वनिष्ठ संघटित होत आहेत. आजपर्यंत जात-पात, समुदाय किंवा विविध वैचारिक गटांमध्ये अडकलेल्या हिंदूंना अशा प्रकारे एका ध्येयाने प्रेरित करणे आणि संघटित करणे, हा हिंदु जनजागृती समितीचा अभिनव प्रयत्न आहे.

हिंदूंच्या समस्या सोडवण्यासाठी हिंदु राष्ट्र हाच एकमात्र उपाय ! – अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी, राष्ट्रीय अध्यक्ष, इंडिया विथ विझडम्

डावीकडून सौ. प्राची जुवेकर, संबोधित करतांना श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी आणि अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी

वाराणसी : देशात प्रत्येक ठिकाणची स्थिती हिंदूंसाठी प्रतिकूल बनत आहे. कोणताही राजकीय पक्ष हिंदूंच्या समस्या सोडवतांना दिसत नाही. सर्व पक्ष अल्पसंख्यांकांच्या लांगूलचालनात व्यस्त आहेत. त्यामुळे हिंदूंच्या समस्या सोडवण्यासाठी हिंदु राष्ट्र हाच एकमात्र उपाय दिसून येतो, असे प्रतिपादन ‘इंडिया विथ विझडम्’चे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता कमलेशचंद्र त्रिपाठी यांनी येथे पत्रकार परिषदेत केले.

हिंदूसंघटनाची वज्रमूठ करून हिंदूंवरील आघातांच्या विरोधात हिंदूंमध्ये जागृती करणे आणि त्या मार्गान्वये हिंदु राष्ट्र स्थापनेची मुहुर्तमेढ रोवणे, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने गोवा येथे ‘सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन’ आयोजित करण्यात आले आहे. या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीने येथील मैदागिन स्थित पराडकर स्मृती भवनात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेला हिंदु जनजागृती समितीचे उत्तरप्रदेश आणि बिहार राज्य समन्वयक श्री. विश्‍वनाथ कुलकर्णी अन् सनातन संस्थेच्या सौ. प्राची जुवेकर उपस्थित होत्या.

अधिवेशनामुळे हिंदुत्वनिष्ठांचे राष्ट्रव्यापी संघटन अधिक मजबूत होईल ! – श्री. कार्तिक साळुंके, हिंदु जनजागृती समिती, देहली

डावीकडून श्री. कार्तिक साळुंके, कर्नल अशोक किणी आणि कु. कृतिका खत्री

देहली : हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी गोवा येथे २ ते १२ जून या कालावधीत ‘सप्तम् अखिल भारतीय हिंदू अधिवेशन’ होणार आहे. त्यामुळे हिंदुत्वनिष्ठांचे राष्ट्रव्यापी संघटन अधिक मजबूत होणार आहे. यात देहलीचे ‘फेथ फाऊंडेशन’चे कर्नल अशोक किणी, प्रज्ञता संस्थेचे सहसंयोजक श्री. आशिष धर, हिंदु फ्रंट फॉर जस्टिसचे प्रवक्ते आणि सर्वोच्च न्यायालयाचे अधिवक्ता विष्णु जैन, अधिवक्ता साई दीपक, अधिवक्ता वेंकटरमणी, आर्य समाज, जनकपुरी, देहलीचे उपाध्यक्ष अधिवक्ता सत्यप्रकाश, रूट्स इन कश्मीरचे श्री. सुशील पंडित, हरियाणा येथील राष्ट्रीय इतिहास अनुसंधान आणि तुलनात्मक अनुसंधान केंद्राचे श्री. नीरज अत्री, गुडगांव येथील अखिल भारतीय जांगिड समाजाचे समादेशक निवृत्त न्यायाधीश अधिवक्ता सीताराम शर्मा, अधिवक्ता अरुण शर्मा, अधिवक्ता सौरभ सचदेवा, अधिवक्ता प्रवीण कुमार आणि इतर हिंदुत्वनिष्ठ सहभागी होणार आहेत, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे श्री. कार्तिक साळुंके यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी ‘फेथ फाऊंडेशन’चे कर्नल अशोक किणी आणि सनातन संस्थेच्या कु. कृतिका खत्री उपस्थित होत्या.

अधिवेशनामध्ये दक्षिण कन्नड जिल्ह्यातील हिंदुत्वनिष्ठ नेते आणि धर्माभिमानी अधिवक्ते सहभागी होणार ! – श्री. चंद्र मोगेर, दक्षिण कन्नड जिल्हा समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

डावीकडून श्री. मधूसुदन अय्यर, श्री. चंद्र मोगेर आणि सौ. लक्ष्मी पै

मंगळुरू (कर्नाटक) : ‘सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशना’मध्ये दक्षिण कन्नड जिल्ह्यातील हिंदुत्वनिष्ठ नेते, तसेच धर्माभिमानी अधिवक्ते सहभागी होणार आहेत. गेल्या वर्षी सहाव्या अखिल भारतीय हिंदू अधिवेशनात ठरवण्यात आल्याप्रमाणे कर्नाटक राज्यात अनेक विषयांवर आंदोलने करण्यात आली. राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय हिंदू अधिवेशनांचे आयोजन करण्यात आले होते. गोवा येथे होणार्‍या हिंदू अधिवेशनामध्ये दक्षिण कन्नड जिल्ह्यातील हिंदुत्वनिष्ठ नेते, तसेच धर्माभिमानी अधिवक्ते सहभागी होणार आहेत, अशी माहिती हिंदु जनजागृती समितीचे दक्षिण कन्नड जिल्हा समन्वयक श्री. चंद्र मोगेर यांनी दिली. या वेळी श्री श्री जगद्गुरु रामानंद स्वामी, महसंस्थान चॅरिटेबल ट्रस्टचे विश्‍वस्त श्री. मधूसुदन अय्यर आणि सनातन संस्थेच्या सौ. लक्ष्मी पै उपस्थित होत्या.

 

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *