Menu Close

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त ओडिशामध्ये ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियान’

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रवचन, धर्मजागृती बैठकांचे आयोजन आणि देवतांना साकडे

झिरपानी येथील श्री जगन्नाथ मंदिरात साधनेविषयी मार्गदर्शन करतांना श्री. प्रकाश मालोंडकर

राऊरकेला (ओडिशा) : परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त ओडिशा राज्यातील राऊरकेला, गुआमल (जिल्हा भद्रक) येथे प्रवचन, देवतांना साकडे घालणे आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

गुआमल येथे प्रवचन

गुआमल येथे श्री. प्रकाश मालोंडकर यांचे मार्गदर्शन ऐकतांना युवक

गुआमल येथे ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची आवश्यकता’ या विषयावर हिंदु जनजागृती समितीचे ओडिशा राज्य समन्वयक श्री. प्रकाश मालोंडकर यांनी मार्गदर्शन केले. या वेळी ध्वनीचित्रफितीच्या साहाय्याने विषय समजावून सांगण्यात आला. नजीकच्या दोन गांवातील ३५ हून अधिक युवा धर्माभिमान्यांनी या प्रवचनाचा लाभ घेतला.

झिरपानी, राऊरकेला येथे आध्यात्मिक मार्गदर्शन

झिरपानी येथील मंदिरातील मूर्ती

झिरपानी, राऊरकेला येथील श्री जगन्नाथ मंदिरात श्री. प्रकाश मालोंडकर यांनी ‘आनंदी जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर मार्गदर्शन केले. या वेळी त्यांनी दैनंदिन जीवनात येणार्‍या व्यक्तीगत, कौटुंबिक, सामाजिक आणि धार्मिक समस्यांमागील कारणे सांगून त्यावरील उपाय सांगितले. या प्रवचनानंतर उपस्थित धर्मप्रेमींनी हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी आणि परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांना स्वास्थ लाभावे यांसाठी भगवान जगन्नाथाच्या चरणी साकडे घातले.

राऊरकेला येथे धर्मप्रेमींची बैठक

राऊरकेला येथील श्री गौरी शंकर मंदिरामध्ये हिंदु राष्ट्र्र संघटन बैठक घेण्यात आली. या वेळी ‘राष्ट्ररक्षण आणि धर्मरक्षण यांसाठी धर्माचरणाची आवश्यकता’ या विषयावर चर्चा करण्यात आली. या बैठकीला उत्कल मेलचे संपादक श्री. पिताबास मिश्रा, माजी संपादक श्री. शिवकुमार शर्मा, अधिवक्ता शत्रुघ्न झा, अधिवक्ता ब्रजेश मिश्रा, अधिवक्ता करमचंद करम, श्री. दर्शन छाब्रा आदि उपस्थित होते. या बैठकीनंतर ‘हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी आणि परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांना उत्तम स्वास्थ लाभावे’, यांसाठी भगवान गौरी शंकर यांच्या चरणी साकडे घातले.

 

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *