‘मस्जिद परिचय’ आयोजित करणारे मुसलमानांचे हिंदूंविषयीचे अपसमज दूर करण्यासाठी त्यांना मंदिरात घेऊन जातील का ?
मुंबई : हिंदु धर्मियांच्या मनातील इस्लामविषयीचे अपसमज आणि धार्मिक तेढ दूर करण्यासाठी ‘जमात-ए-इस्लामी हिंद’ या संघटनेने ‘मस्जिद परिचय’ उपक्रम आयोजित केला आहे. या माध्यमांतून अन्य धर्मियांसाठी, विशेषतः हिंदूंसाठी मशिदीचे दरवाजे उघडले जात आहेत. (‘हिंदू काफीर असून त्यांना ठार करणे, हा अल्लाचा आदेश आहे’, अशी धारणा बाळगणार्या मुसलमानांनी हिंदूंना मशिदीमध्ये नेणे, हे निवळ ढोंग आहे, असे म्हटल्यास चूक ते काय ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) ‘सर्वांसाठी इस्लाम’ या मोहिमेच्या अंतर्गत पूर्ण महाराष्ट्रभर समुदायांमध्ये संवाद घडवून आणून त्यातून एकमेकांविषयीच्या तक्रारी दूर करण्याचा हा प्रयत्न असल्याचे ‘जमात-ए-इस्लामी हिंद’च्या कुर्ला शाखेचे अध्यक्ष हसीब भाटकर यांनी सांगितले. (हिंदूंविरुद्ध लव्ह जिहादसह १४ प्रकारचे जिहाद पुकारणारे धर्मांध अशा धूर्त मोहिमा आखून हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करतात. हिंदूंनी वेळीच हा कावेबाजपणा ओळखून आपल्या धर्मबांधवांचे प्रबोधन करून हा डाव हाणून पाडायला हवा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
कुर्ला येथील हलाई मेमन मशिदीत काही आठवड्यांपूर्वी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ५-६ हिंदूंसह एका वृत्तवाहिनीच्या गटालाही मशिदीत येण्यासाठी आमंत्रण दिले होते. (धर्मांधांच्या धूर्त खेळीला बळी पडणारे भोळसट हिंदू ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या कार्यक्रमामध्ये वुझू करणे (मुख्य मशिदीत प्रवेश करण्यापूर्वी हात-पाय-तोंड धुणे) मशिदीची, नमाजाची माहिती देणे, अल्पोपहार, गप्पा मारणे आदी गोष्टींचा समावेश असतो. (ज्या हिंदूंना निमंत्रण देण्यात आले, त्यांनी आयोजकांना धर्मांधांच्या उच्छादाच्या संदर्भात खडसावले का नाही ? धर्माभिमानाचा अभाव असल्यानेच हिंदू सर्वधर्मसमभावासारख्या भाकड गोष्टींना भुलतात. धर्मशिक्षण दिल्यासच ही दु:स्थिती पालटू शकेल ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात