रामनाथी (गोवा) – वर्ष १९४७ मध्ये फाळणी झाल्यावर देश स्वतंत्र झाला. त्यानंतर वर्ष १९५० मध्ये संविधान अंमलात आणले गेले. त्या वेळी सर्वांना समान न्याय मिळेल, असे सांगितले गेले. त्यामुळे सर्व अत्याचार विसरून हिंदूंनी ते स्वीकारण्याची सिद्धता दर्शवली; मात्र प्रत्यक्षात निधर्मीपणाच्या नावाखाली अल्पसंख्यांकांना सुविधा देऊन हिंदूंचे दमन केले जात आहे. आज मुसलमान त्यांच्या धर्मासाठी ‘फिदाईन’ होऊन वेळप्रसंगी स्वतःचा जीव देण्यास सिद्ध होतात. असे असतांना आपण हिंदु अधिवक्त्यांनीही कायद्याचा अभ्यास करून, न्यायालयात ‘फिदाईन’ बनून हिंदूंना न्याय मिळवून देण्यासाठी निःस्वार्थ वृत्तीने जीवापाड प्रयत्न करायला हवेत.
देशामध्ये मोठ्या प्रमाणात हिंदूंचे धर्मांतर होत असून ते रोखणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर धर्मांतरविरोधी कायदा होण्यासाठी अधिवक्त्यांनी प्रयत्न करावा. आपले भविष्य सुरक्षित करायचे असेल, तर हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रयत्न करायला हवेत, असे प्रतिपादन लक्ष्मणपुरी (लखनौ) येथील ‘हिंदु फ्रटं फॉर जस्टिस’चे अध्यक्ष अधिवक्ता हरि शंकर जैन यांनी केले. ते येथील श्री रामनाथ देवस्थानच्या श्री विद्याधिराज सभागृहात आयोजिलेल्या दोन दिवसीय ‘राष्ट्रीय अधिवक्ता अधिवेशना’च्या उद्घाटन सत्रात बोलत होते.
अधिवक्ता हरि शंकर जैन यांनी मांडलेली महत्त्वपूर्ण सूत्रे
- हिंदूंच्या विरोधात निर्णय झाले, तर तो न्याय आणि हिंदूंच्या बाजूने निर्णय झाला, तर तो अन्याय, अशी विपरीत स्थिती आज निर्माण झाली आहे. हिंदू प्रथम हा नारा आता द्यायला हवा. जे कायदे हिंदूंना न्याय देऊ शकत नाहीत, ते पालटण्याची आज आवश्यकता आहे.
- हिंदू अप्रसन्न झाले, तर सत्ता मिळणार नाही, हे राजकीय पक्षांना ठणकावून सांगण्याची आवश्यकता आहे.
- धर्मनिरपेक्षता हा देशातील एक राक्षस आहे. तो गाडायला हवा !
- सच्चर आयोगानुसार जर मुसलमान गरीब आहेत, तर गल्लोगल्ली मशिदी बनवण्यासाठी पैसा कुठून येत आहे ?
- धर्मरक्षणासाठी कार्यरत असतांना कुणी हिंदूंना सांप्रदायिक म्हणले, तर अभिमानाने सांगा, हिंदू सांप्रदायिक आहेत !
- सध्या सर्वत्र मुसलमानी मानसिकता पहायला मिळते. ती मानसिकता पालटून आपल्याला हिंदु विचार समोर ठेवायला हवेत.
- हिंदूंचे धर्मशास्त्र लहान मुलांपर्यंत पोहोचवायला हवे. लहान मुलाने इंग्रजी कविता म्हणून दाखवल्यावर कौतुक वाटणार्या पालकांना मुलाने गायत्रीमंत्र, हनुमानचालिसा म्हणावी, असे वाटते का ?
- कैराना (उत्तरप्रदेश) येथे झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर अल्ला जिंकला, राम हरला असे नारे दिले गेले. असे नारे ऐकायचे नसतील, तर हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कार्य करणे आवश्यक आहे.
हिंदु राष्ट्रासाठी प्रसंगी बलीदान देऊ ! – अधिवक्ता हरि शंकर जैन
देश, धर्म, संस्कृती वाचवण्यासाठी हिंदु राष्ट्राची आवश्यकता आहे. हिंदु राष्ट्रासाठी आम्ही प्रसंगी बलीदान देऊ; पण हिंदु राष्ट्राच्या मागणीपासून मागे हटणार नाही.