राष्ट्रीय अधिवक्ता अधिवेशनातील उद्बोधन सत्र : ‘राष्ट्र आणि धर्म रक्षणासाठी अधिवक्ता संघटनांनी केलेले कार्य’
हिंदुत्वाच्या कार्यात हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांची आवश्यकता स्पष्ट करतांना सुनील घनवट म्हणाले की,
१. संभाजीनगर येथे गेल्या मासात झालेल्या दंगलीत हिंदुत्वनिष्ठांवर गुन्हे प्रविष्ट करण्यात आले. याचसमवेत मलकापूर (जिल्हा बुलडाणा) येथे झालेल्या दंगलीत २० धर्मांध अधिवक्त्यांनी धर्मांधांना साहाय्य केले; मात्र त्यांच्या विरोधात कुठलाही गुन्हा प्रविष्ट करण्यात आला नाही.
२. कर्नाटक येथील गोरक्षकांनी गायी पशूवधगृहात घेऊन जाणार्या ट्रकला पकडून पोलीस ठाण्यात नेले. तेथे पोलिसांनी हिंदुत्वनिष्ठांनाच प्रश्न केला की, कोणत्या कलमाखाली यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करायला हवा ? यावर हिंदुत्वनिष्ठांनी उत्तर न दिल्याने पोलिसांनी हिंदुत्वनिष्ठांवरच गुन्हे प्रविष्ट केले.
३. सातारा येथे पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यासाठी गेलेल्या हिंदुत्वनिष्ठांना ४-५ घंटे पोलीस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले. तक्रार प्रविष्ट करण्यास विलंब केला जात होता. तेव्हा अधिवक्त्यांना संपर्क केला. त्यांचे पोलिसांशी संभाषण झाले असता तात्काळ तक्रार नोंदवून घेण्यात आली.
हिंदुत्वनिष्ठांना कायद्याची संपूर्ण माहिती नसल्याने त्यांना हिंदुत्वाचे कार्य करतांना अशा प्रकारच्या अनेक प्रसंगात अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अशा वेळी हिंदुत्वनिष्ठांना धर्मप्रेमी अधिवक्त्यांनी त्यांना कायदेशीर मार्गदर्शन करून साहाय्य करावे.