भारतातील नागरिकांच्या विवाहासंदर्भात पूर्वी केवळ इंडियन मॅरेज अॅक्ट होता. यानंतर आंतरधर्मीय विवाह करता यावा, यासाठी स्पेशल मॅरेज अॅक्ट सिद्ध करण्यात आला. हा कायदा भयंकर असून त्यामळे मुसलमानांना हिंदूंशी विवाह करण्याचे स्वातंत्र्य मिळते. त्याने लव्ह जिहादला प्रोत्साहन मिळते. त्यामुळे तो रहित होण्यासाठी जागृती अत्यावश्यक आहे. गोवा येथे सुरु असलेल्या अधिवक्ता अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच्या दुस-या सत्रात जोधपूर येथील अॅड. मोती सिंह राजपुरोहित यांनी असे प्रतिपादन केले.
या वेळी मोती सिंह राजपुरोहित म्हणाले,
१. लव्ह जिहाद हा प्रकार इतिहासकाळापासून अस्तित्वात असून महंमद बीन कासीमच्या काळापासून चालू आहे.
२. वर्ष १९९२ नंतर उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल आदी राज्यांच्या सीमांवर २२ सहस्र मदरसे निर्माण झाले आहेत. ते धर्मांतराचे मोठे अड्डे बनत आहेत. याच्या विरोधात कृती करण्याची आवश्यकता आहे.