गोवा (विद्याधिराज सभागृह) – येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय अधिवक्ता अधिवेशनातील प्रथम दिवसाच्या दुस-या सत्रात बोलताना अॅड. वासुदेव ठाणेदार म्हणाले कि, सप्टेंबर २००९ मध्ये गणेशोत्सव काळात शिवसेनेने लावलेल्या कमानीवर अल्पसंख्यांकांनी आक्षेप घेत दगडफेक केली आणि त्यातून पुढे मोठी दंगल उसळली. या वेळी तत्कालीन आमदार श्री. चंद्रकांत पाटील आणि श्री. सुरेश खाडे यांच्या नेतृत्वाखाली हिंदूंचा मोठा मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा पोलिसांनी अडवला आणि १५० हिंदूंना अटक केली. मला हे समजल्यानंतर मी तात्काळ ३५ अधिवक्त्यांना संघटित करून पोलीस ठाण्यात उपस्थित झालो. या सर्व खटल्यांचे विशेष म्हणजे हे सर्व खटले आम्ही सर्व अधिवक्ते विनामूल्य चालवत आहोत.
मिरज दंगलीच्या काळात ६०० हून अधिक जणांना अटक करण्यात आली. यात बहुसंख्य हिंदू होते. हिंदूंवर झालेल्या अन्याय्य खटल्याच्या संदर्भात आम्ही हिंदू अधिवक्त्यांनी कामकाजाचे विकेंद्रीकरण केले. यात एका अधिवक्त्यांनी जामीन करणे, दुसर्यांनी कागदपत्रे गोळा करणे, तिसर्यांनी न्यायालयात बाजू मांडणे अशी कृती केल्याने खटल्यांत सुसूत्रता येऊन हिंदूंना लवकर दिलासा मिळू शकला.