गोवा (विद्याधिराज सभागृह) – येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय अधिवक्ता अधिवेशनातील प्रथम दिवसाच्या दुस-या स त्रात बोलताना हिंदु विधीज्ञ परिषदेचे सदस्य अॅड. निरंजन चौधरी म्हणाले कि, जळगावमध्ये एकाच कुटुंबातील दोन धर्मांध पोलिसांनी एका हिंदु तरुणीला फसवून लव्ह जिहादच्या जाळ्यात ओढले होते. त्या विरोधात पोलीस तक्रार प्रविष्ट करून घेत नव्हते. त्यामुळे आम्हाला काही कार्यकर्त्यांसह पोलीस आयुक्तांकडे तक्रार प्रविष्ट करावी लागली; परंतु १९ दिवसांनंतरही त्या दोन्ही धर्मांध पोलिसांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला नव्हता. त्यानंतर जेव्हा गुन्हा नोंदवला गेला, त्या वेळी मूळ तक्रारीमध्ये फेरफार करण्यात आला होता. त्या आधारे त्या धर्मांध पोलिसांनी न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवला. एकूण या प्रकरणाच्या विरोधात हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी सुचवल्याप्रमाणे या विषयावर पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर आम्ही न्यायालयात अटकपूर्व जामिनाच्या विरोधात युक्तीवाद केला आणि त्यामध्ये फिर्यादीची मूळ तक्रार अन् पोलिसांनी फेरफार केलेली तक्रार यांमधील भेद दर्शवला. यामुळे न्यायालयाने त्या २ धर्मांध पोलिसांचा अटकपूर्व जामीन रहित केला आणि त्यांना अडीच मास कारावासात रहावे लागले.
डिसेंबर २०१७ मध्ये जळगावमध्ये दंगल झाली होती. या प्रकरणातही आम्ही त्यातील हिंदू कार्यकर्त्यांना साहाय्य केले. या दोन्ही प्रकरणात मिळालेले यश हे हिंदु विधीज्ञ परिषदेमुळेच मिळू शकले.
माझ्याकडून सतत धर्मकार्य घडू दे ! – अधिवक्ता निरंजन चौधरी
सध्या माझ्याकडे ७० टक्के खटले धर्माविषयीचे आहेत. त्यामुळे भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना आहे की, पैशाचा मोह न होता माझ्याकडून सतत धर्मकार्य होऊ दे !
अधिवक्ता निरंजन चौधरी यांचा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव
मागील वर्षी मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे दर्शन झाले. त्यानंतर माझी बॅटरी पूर्ण भारित झाली आणि त्यामुळे मी आजपर्यंत धर्मकार्य सेवा म्हणून प्रभावीपणे करू शकलो.