गोवा (विद्याधिराज सभागृह) – येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय अधिवक्ता अधिवेशनातील प्रथम दिवसाच्या दुस-या स त्रात बोलताना प्रयाग येथील अॅड. अवधेश राय म्हणाले की, एका गावात मंदिर होते. ते धर्मांधांनी अवैधरित्या कह्यात घेतली आणि मुघलकाळात त्याला दर्गा आणि मशिदी यांचे स्वरूप दिले गेले. ही वास्तू मंदिरच आहे, हे सिद्ध करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. या प्रकरणाला स्थानिक काँग्रेसी नेत्याने हिंदू-मुसलमान असा जातीय रंग देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पोलीस-प्रशासन यांना संपर्क करून सदर ठिकाणी मोठी जातीय दंगल होणार असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा त्या ठिकाणी आला. या प्रकरणी स्थानिक हिंदूंनीही मला साहाय्य केले नाही.
हे प्रकरण कालांतराने थंड झाल्यानंतर मुसलमानांचे मी लिखित स्वरूपात म्हणणे घेतले की, सदर ठिकाण आमचे धर्मस्थळ नाही. याविषयीची पत्रकार परिषद घेतली. हा विषय नंतर प्रसिद्धीमाध्यमांनी उचलला आणि काँग्रेसी नेत्याने विषय कसा भडकवला, हे समोर आणले. त्यानंतर नवमीच्या दिवशी हनुमानाची मूर्ती तेथे प्रकट झाली. त्याची प्राणप्रतिष्ठा केली गेली.
चक्रावणारा न्याय !
एका प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाने एक अवैध मशीद भुईसपाट करण्याचा आदेश दिला. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक प्रशासन आणि सरकार यांना विचारणा केली की, सदर मशिदीसाठी पर्यायी भूमी मिळू शकेल का ? उच्च न्यायालय मशीद अवैध असल्याने पाडण्याचा निर्वाळा देते, तर सर्वोच्च न्यायालय त्यासाठी पर्यायी भूमी शोधण्याचा आदेश देते !