बांगलादेश येथील अल्पसंख्य हिंदूंच्या रक्षणासाठी ढाल बनून कार्य करणारे बांगलादेश मायनॉरिटी वॉचचे अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष यांनी बांगलादेश येथे हिंदूंवर होत असलेला अन्याय, धर्मांधांकडून हिंदुत्वनिष्ठांचा केला जाणारा छळ यांविषयी अवगत केले. बांगलादेशात धर्मांधांनी माझे घर दोन वेळा तोडले; पण ते माझे धैर्य आणि माझा विश्वास तोडू शकत नाहीत. आम्ही सत्य आणि हिंदुत्वासाठी झटतो. त्यामुळे आम्हाला कोणी साहाय्य करत नाही. असे असले, तरी बांगलादेशातील हिंदूमध्ये जागृती करून आम्ही तेथेही हिंदु राष्ट्र निर्माण करण्यासाठी प्रयत्नरत रहाणार आहोत.
बांगलादेशात हिंदूंवर प्रचंड अत्याचार होत असून तेथील हिंदूंच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. १९७२ ला १६ टक्के असणारी हिंदूंची लोकसंख्या सध्या केवळ ९ टक्के राहिली आहे. बांगलादेशातील हिंदू भारत, तसेच अन्य देशात आश्रय शोधत आहेत. तेथील सरकारने हिंदूंचे रक्षण न केल्याने हिंदूंचे जीवन नरकमय झाले आहे, असेही ते म्हणाले.