Menu Close

अधिवक्ता अधिवेशनाच्या समारोपीय सत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन आणि हिंदुत्वनिष्ठांचे अनुभवकथन !

अधिवक्ता अधिवेशनाच्या समारोपाच्या सत्रात  राष्ट्र अन् धर्म रक्षणार्थ अधिवक्त्यांनी व्यक्तीगत स्तरावर केलेले कार्य यांविषयी अधिवक्त्यांनी त्यांचे अनुभव सांगितले, तर भारत सरकारचे माजी सांस्कृतिक सल्लागार प्रा. रामेश्‍वर मिश्र यांनी विद्यमान न्याययंत्रणेतील त्रुटी दूर करण्यासाठीचे प्रयत्न यांविषयी मार्गदर्शन केले. त्याचा वृत्तांत देत आहोत.

धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद या शब्दांची संविधानिक व्याख्या करा ! – प्रा. रामेश्‍वर मिश्र, माजी सांस्कृतिक सल्लागार, भारत सरकार 

आणीबाणीच्या काळात घटनादुरुस्ती करून धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद हे शब्द संविधानात घुसडण्यात आले. धर्मनिरपेक्षताचा अर्थ आज हिंदुद्रोह असा झाला आहे. समाजवादाचा सर्वमान्य प्राथमिक अर्थ म्हणजे सर्व गोष्टींवर राज्याचे पूर्ण नियंत्रण ! धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद या शब्दांची व्याख्या करा, अशी मागणी देशभरातून व्हायला हवी. तसे झाले, तर धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद यांच्या नावाखाली चाललेल्या हिंदुद्रोहाला आळा बसेल, असे प्रतिपादन भारत सरकारचे माजी सांस्कृतिक सल्लागार प्रा. रामेश्‍वर मिश्र यांनी केले. ते सप्तम अखिल भारतीय हिंदू अधिवेशनाच्या द्वितीय दिवशीच्या उद्बोधन सत्रात बोलत होते.

बांगलादेशातही हिंदु राष्ट्र स्थापन करणार ! – अधिवक्ता रवींद्र घोष, बांगलादेश मायनॉरिटी वॉच

बांगलादेश येथील अल्पसंख्य हिंदूंच्या रक्षणासाठी ढाल बनून कार्य करणारे बांगलादेश मायनॉरिटी वॉचचे अध्यक्ष अधिवक्ता रवींद्र घोष यांनी बांगलादेश येथे हिंदूंवर होत असलेला अन्याय, धर्मांधांकडून हिंदुत्वनिष्ठांचा केला जाणारा छळ यांविषयी अवगत केले. बांगलादेशात धर्मांधांनी माझे घर दोन वेळा तोडले; पण ते माझे धैर्य आणि माझा विश्‍वास तोडू शकत नाहीत. आम्ही सत्य आणि हिंदुत्वासाठी झटतो. त्यामुळे आम्हाला कोणी साहाय्य करत नाही. असे असले, तरी बांगलादेशातील हिंदूमध्ये जागृती करून आम्ही तेथेही हिंदु राष्ट्र निर्माण करण्यासाठी प्रयत्नरत रहाणार आहोत.

लव्ह जिहादींचे लक्ष्य आता १४ ते १८ वर्षे वयोगटातील मुली ! – अधिवक्ता भरत तोमर, भोपाल, मध्यप्रदेश.

धर्मांध पूर्वी २० ते २२ वयाच्या हिंदु युवतींना जाळ्यात ओढत. यानंतर त्यांनी १८ ते २०, १६ ते १८ या वयोगटातील आणि आता १४ ते १८ वयाच्या हिंदु युवतींना जाळ्यात ओढण्यास प्रारंभ केला आहे. १४ ते १८ वयाच्या युवतींना जाळ्यात ओढणे अधिक सोपे जाते, असे धर्मांधांचे म्हणणे आहे. लव्ह जिहादची अनेक प्रकरणे आमच्याकडे येतात. यातील किमान १५० हून युवतींना आम्ही आतापर्यंत वाचवू शकलो. समविचारी हिंदुत्वनिष्ठ अधिवक्त्यांना एकत्र करून हिंदूंवर होणार्‍या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम करत आहे.

 

चित्रपट परीनिरीक्षण मंडळाच्या माध्यमातून चित्रपटांच्या माध्यमातून होणारे विडंबन रोखले ! – अधिवक्ता गंगाधर भूमा, अध्यक्ष, धर्मपरीक्षण शासन मंडळ, भाग्यनगर(हैद्राबाद), तेलंगणा

हिंदु जनजागृती समितीच्या संपर्कात आल्यावर विविध ठिकाणी धर्मावर होत असलेले आघात रोखले. या माध्यमातून प्रसिद्धी मिळाली आणि राज्य चित्रपट परीनिरिक्षण मंडळाच्या सदस्यपदी निवड झाली.

सदस्यपदाच्या कालावधीत ज्या चित्रपटात हिंदुविरोधी दृष्ये असतील तिथे आक्षेप घेतले.

अशाप्रकारे चित्रपट परीनिरीक्षण मंडळाच्या माध्यमातून चित्रपटांच्या माध्यमातून होणारे विडंबन ईश्‍वरी कृपेमुळे मी रोखू शकलो, असे प्रतिपादन अधिवक्ता गंगाधर भूमा यांनी केले.

हिंदूंनी संघटित होण्याची आवश्यकता ! – अधिवक्ता बिमलेंदु मुखोपाध्याय, सदस्य, हिंदु जनजागृती समिती, हुगळी, पश्‍चिम बंगाल.

पश्‍चिम बंगालमध्ये ममता (बानो) बॅनर्जी यांच्याकडून हिंदूंचा मानसिक छळ चालू असून संघे शक्ती कलैयुगे या उक्तीनुसार हिंदूंना संघटित होण्याची आवश्यकता आहे.

लव्ह जिहादच्या घटनेतील आरोपींना शिक्षा ठोठावण्यास यशस्वी ! – अधिवक्ता जगदिश हाके, नांदेड, महाराष्ट्र

जिल्ह्यात लव्ह जिहाद करून एका धर्मांधाने हिंदु युवतीशी विवाह केला. ज्याच्याशी विवाह केला, त्याने त्या युवतीवर अत्याचार केले. त्याही पुढे जाऊन या धर्मांधाचे वडील, भाऊ असे सर्वांनी त्या युवतीवर अत्याचार केला. शेवटी त्या युवतीने घरी परत जाण्याचा निर्णय घेतला आणि घरी आल्यावर पोलीस ठाण्यात त्या तिघांविरोधात तक्रार प्रविष्ट केली.

यानंतर न्यायालयीन प्रक्रिया चालू झाली. या वेळी काही धर्मांध अधिवक्त्यांनी त्या मुलीचे समुपदेशन करून तिचे मन परिवर्तन करण्याचे प्रयत्न केला; परंतु हा प्रयत्न आम्ही हाणून पाडला.

पुढे हिंदु अधिवक्त्यांच्या सहकार्याने यातील तीनही आरोपींना ७ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली.

प्रचारसभेत पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिल्या गेलेल्या धर्मांधावर कोणत्या  कलमाखाली गुन्हे नोंदवायचे, हेही पोलिसांना ठाऊक नसणे आणि अधिवक्त्यांनाच त्याविषयी सांगावे लागणे !

बेळगाव, कर्नाटक येथील अधिवक्ता प्रवीण करोशी यांनी पोलिसांच्या अज्ञानाविषयीचा एक अनुभव सांगितला. ते म्हणाले, नुकत्याच झालेल्या कर्नाटक येथील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या काळात बेळगाव येथील धर्मांध आमदाराच्या प्रचारफेरीत पाकिस्तान जिंदाबाद च्या घोषणा देण्यात आल्या. समाजातील लोकांना संघटित करून आम्ही या संदर्भात पोलीस ठाण्यात गेलो. तेथे पोलिसांना कोणत्या कलमाखाली गुन्हा प्रविष्ट करायचे, हे आम्हीच सांगितले. तेव्हा त्यांच्यावर गुन्हा प्रविष्ट करण्यात आला.

ओडिशामध्ये अल्पसंख्यांकांच्या नावाखाली भूमी हडपण्याचे षड्यंत्र ! – अधिवक्ता रमेश पंडा, ओडिशा

ओडिशामध्ये काही ख्रिस्ती लोकांकडून शासकीय भूमीवर शिक्षण, व्यायामशाळेचे फलक लावून ती हडप करण्याचे षड्यंत्र चालू आहे. अल्पसंख्यांकांच्या हिताच्या कार्यासाठी या भूमी घेतल्याचे सांगितले जाते; प्रत्यक्षात मात्र तेथे शिक्षणसंस्था उभ्या केल्या जातात.

Related News

0 Comments

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *