हिंदु जनजागृती समितीच्या संपर्कात आल्यावर विविध ठिकाणी धर्मावर होत असलेले आघात रोखले. या माध्यमातून प्रसिद्धी मिळाली आणि राज्य चित्रपट परीनिरिक्षण मंडळाच्या सदस्यपदी निवड झाली. सदस्यपदाच्या कालावधीत ज्या चित्रपटात हिंदुविरोधी दृष्ये असतील तिथे आक्षेप घेतले. अशाप्रकारे चित्रपट परीनिरीक्षण मंडळाच्या माध्यमातून चित्रपटांच्या माध्यमातून होणारे विडंबन ईश्वरी कृपेमुळे मी रोखू शकलो, असे प्रतिपादन अधिवक्ता गंगाधर भूमा यांनी केले.
अधिवक्ता गंगाधर भूमा पुढे म्हणाले, हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून अनेक ठिकाणी धर्मजागृती सभांचे यशस्वी आयोजन केले. यात माझे जन्मगाव, माझे शिक्षण झाले, ते ठिकाण, तसेच अन्य ठिकाणी या सभांचे आयोजन केले. हिंदूंच्या एकत्रिकरणासाठी सामूहिक आरतीचे नियोजन केले. धर्माचे कार्य करण्यास प्रारंभ केल्यापासून आर्थिक, भौतिक, मानसिक स्थिती यांत सकारात्मक परिवर्तन झाले.